हिंदी सिनेसृष्टीपासून हॉलिवूडपर्यंत आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडणारी सुपरस्टार प्रियांका चोप्रा सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. नुकतंच तिने बॉलिवूडमधील राजकारणावर भाष्य केल्याने ती चर्चेत आली. या राजकारणाला कंटाळूनच तिने हा निर्णय घेतल्याचं तिने डेक्स शेफर्डचा पॉडकास्ट या शोमध्ये खुलासा केला. यावर बऱ्याच कलाकारांनी प्रतिक्रिया दिली. आता प्रियांकाने पुन्हा एकदा आपल्या बॉलिवूडमधील राजकारणावरील वक्तव्यावर भाष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- सलमान खानच्या ‘त्या’ फोटोवर एक्स गर्लफ्रेंडची कमेंट, चाहते म्हणाले “पहिलं प्रेम…”

सोमवारी प्रियांका चोप्राच्या एका चाहत्याने तिचा लेटेस्ट व्हिडिओ शेअर केला. प्रियांकाचा हा व्हिडिओ तिच्या आगामी हॉलिवूड वेब सीरीज ‘सिटाडेल २’ च्या प्रमोशन दरम्यानचा आहे. या व्हिडिओमध्ये प्रियंका बॉलिवूड सोडण्याच्या विधानाविषयी बोलताना दिसत आहे, जे तिने डॅक्स शेफर्डच्या पॉडकास्ट दरम्यान दिले होते.

प्रियांकाने म्हटले आहे की, ‘मला वाटतं पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत मी माझ्या १०, १५ आणि २० वर्षांची असतानाच्या प्रवासाबद्दल खुलेपणाने बोलले. मी माझ्या प्रवासातील सत्याबद्दल बोलले. कारण मी माझ्या आयुष्याच्या त्या टप्प्याबद्दल बोलताना पूर्ण आत्मविश्वास बाळगून होते. मला जे वाटले ते मी स्पष्टपणे सांगितले.

प्रियांकाने बॉलिवूडवर कोणते आरोप केले?

प्रियांका चोप्रा सध्या तिच्या ‘सिटाडेल’ वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी तिने डेक्स शेफर्डचा पॉडकास्ट शो ‘आर्मचेयर एक्सपर्ट’मध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असताना बॉलिवूड सोडून गायनाला सुरुवात का केली आणि अमेरिकेत का काम शोधू लागली, याचा खुलासा केला होता.

हेही वााच- “यार गौरी तू…”; पत्नीने शेअर केलेल्या फॅमिली फोटोवर शाहरुख खानची मजेशीर कमेंट

प्रियांका म्हणाली, “मला बॉलिवूडमध्ये जे काम मिळत होतं, त्यापासून मी खूश नव्हते. मला बॉलिवूडमध्ये कॉर्नर केलं जात होतं. मला चित्रपटांमध्ये घेतलं जात नव्हतं, मला खूप जणांकडून तक्रारी होत्या. मला इंडस्ट्रीत गेम खेळता येत नाही, इथल्या राजकारणाला मी कंटाळले होते आणि मला ब्रेक हवा होता.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka chopra on her statement about campism and politics in bollywood industry dpj
Show comments