Priyanka Chopra Praises Stree 2 Songs : अभिनेत्री प्रियांका चोप्राने बॉलीवूडपासून हॉलीवूडपर्यंत प्रवास केला आहे. सध्या हॉलीवूडमध्ये विविध कलाकृतींमध्ये झळकणारी प्रियांका अनेकदा कार्यक्रम आणि लग्न समारंभाच्या निमित्तानं भारतात येते. नुकतीच ती राधिका आणि अनंत अंबानी यांच्या लग्नात दिसली होती. जरी प्रियांका सध्या हॉलीवूडमध्ये सक्रिय असली तरी बॉलीवूडशी असलेले तिचं नातंही तितकंच घट्ट आहे, हे तिच्या नव्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून स्पष्ट होते. ती बॉलीवूडच्या गाणी आणि सिनेमा यांच्यावर लक्ष ठेवून असते. तिला ‘स्त्री २’मधील एक गाणं खूप आवडलं असून, तिनं या गाण्यातील कलाकारांची स्तुती केली आहे.

इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करीत तिनं ‘स्त्री २’मधील तिचं आवडतं गाणं लावलं आणि त्यातील कलाकारांना टॅग केलं आहे. ‘स्त्री २’ हा सिनेमा ५ सप्टेंबर २०२४ रोजी प्रदर्शित झाला आणि या सिनेमानं अवघ्या सात दिवसांतच जागतिक स्तरावर ४०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. या भययुक्त विनोदी सिनेमातील गाणी प्रेक्षकांच्या ओठी रुळली आहेत. त्यापैकी काही गाणी हिट ठरली आहेत. प्रियांका चोप्रालाही ‘स्त्री २’मधील एक गाणं आवडलं आहे.

हेही वाचा…“मला कलाकारांपेक्षा क्रिकेटर आणि फुटबॉलपटू…”, करीना कपूर म्हणाली, “आई झाल्यानंतर…”

‘स्त्री २’ सिनेमात ‘आई नयी’, ‘आज की रात’, ‘खूबसूरत’, ‘तुम्हारे ही रहेंगे’ अशी गाणी आहेत. त्यापैकी ‘आज की रात’ हे गाणं प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे आणि हे गाणं पाहण्यासाठी अनेक प्रेक्षक सिनेमागृहांत गर्दी करीत आहेत. याच गाण्याचं आकर्षण प्रियांका चोप्रालाही झालं आहे. हे गाणं अभिनेत्री तमन्ना भाटियावर चित्रित करण्यात आलं असून, तिच्या अप्रतिम नृत्यकौशल्य आणि अदा यांनी हे गाणं प्रेक्षकांना खूप आवडलं आहे. याच गाण्याचं कौतुक करताना प्रियांकानं इन्स्टा स्टोरीवर तमन्ना आणि राजकुमार रावला टॅग करीत त्यांची स्तुती केली आहे. “हे गाणं खूप सुंदर आहे. तमन्ना, तू खूप छान आहेस. राजकुमार, तू तर सोनंच आहेस,” असं म्हणत तिनं दोघांचं कौतुक केलं आहे. याचबरोबर तिनं श्रद्धा कपूरचंही “तू अगदीच राणी आहेस”, असं म्हणत कौतुक केलं आहे.

Tamannaah Bhatia reply to priyanka chopra story
प्रियांकाने तमन्नाचे कौतुक केल्यानंतर तिने प्रियांकाची स्टोरी रिपोस्ट करत तिचे आभार मानले आहे. (Image – Tamannaah bhatia Instagram)

प्रियांकानं ही स्टोरी पोस्ट केल्यानंतर तमन्नानं ती स्टोरी रिपोस्ट करीत प्रियांकाचे आभार मानले आहेत. त्यामध्ये तमन्नाने “धन्यवाद”, असं लिहिलं आहे आणि हार्टच्या इमोजींचा वापर केला आहे. त्याशिवाय राजकुमार रावनंही प्रियांकाची स्टोरी रिपोस्ट करीत तिचे आभार मानले आहेत. “धन्यवाद प्रिय प्रियांका,” असं म्हणत राजकुमारनं तिला प्रतिसाद दिला आहे.

rajkumaar rao give reply to priyanka chopra
प्रियांकाने राजकुमारचे कौतुक केल्यानंतर त्याने प्रियांकाची स्टोरी रिपोस्ट करत तिचे आभार मानले आहे. (Photo – rajkumaar rao instagram)

हेही वाचा…Video: बेस्ट फ्रेंड मलायका अरोराचे सांत्वन करायला पोहोचली करीना कपूर, सैफ अली खानही सोबतीला

दरम्यान, प्रियांका चोप्रा लवकरच अमेरिकन ॲक्शन-कॉमेडी सिनेमा ‘हेड्स ऑफ स्टेट’मध्ये झळकणार आहे; ज्यात इद्रिस एल्बा व जॉन सीना तिचे सहकलाकार आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन इल्या नैशुलर यांनी केलं आहे; तर पीटर सफ्रान व जॉन रिकार्ड यांनी निर्मिती केली आहे. प्रियांकानं ज्या ‘स्त्री २’ सिनेमातील गाण्याचं कौतुक केलं, तो ‘स्त्री २’ हा सिनेमा २०१८ साली प्रदर्शित झालेल्या ‘स्त्री’ या हॉरर कॉमेडी सिनेमाचा सीक्वेल आहे. त्यात श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव मुख्य भूमिकांत आहेत. मॅडॉक फिल्म्सनं या सिनेमाची निर्मिती केली असून, ते ‘मॅडॉक सुपरनॅचरल युनिव्हर्स’ या फ्रँचायझीचा भाग आहे. या फ्रँचायझींतर्गत ‘स्त्री’, ‘भेडिया’, ‘मुंज्या’, ‘रुही’ व ‘स्त्री २’ असे हॉरर कॉमेडी सिनेमे तयार झाले आहेत.

Story img Loader