काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत प्रियांका चोप्राने ‘आरआरआर’ चित्रपटाला तमिळ चित्रपट म्हटलं होतं. त्यानंतर तिच्यावर जोरदार टीका झाली होती. ‘आरआरआर’ हा एसएस राजामौलींचा तेलुगू चित्रपट आहे, हा चित्रपट हिंदीसह काही दाक्षिणात्य भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. प्रियांकाने त्याचा उल्लेख तमिळ चित्रपट केल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं होतं. त्यावर आता प्रियांकाने प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – अ‍ॅस्ट्रो मेंबर मूनबिनचं निधन, राहत्या घरात आढळला मृतदेह

“लोक माझ्या कोणत्याही गोष्टीत चूक शोधण्याचा प्रयत्न करतात. मला वाटते की लोकांना त्यात थोडा आनंद वाटतो. आधी मी खूप मोकळेपणाने बोलायचे, पण आता मी जरा सावध झाले आहे, कारण माझ्याकडे विचार करण्यासाठी माझे कुटुंब आहे. तुम्ही आयुष्यात जितके पुढे जाता, जितके जास्त लोक तुम्हाला खाली ओढण्याची कारणं शोधतात. पण त्याच वेळी, मला माझे कुटुंब, मित्र आणि चाहत्यांचे खूप प्रेम आणि पाठिंबा आहे. त्यामुळे मी त्यावर लक्ष केंद्रित करण्यास प्राधान्य देते,” असं ती ‘मिड डे’शी बोलताना म्हणाली.

Video: आकांक्षा दुबेचा आत्महत्येपूर्वीचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल; रडत म्हणाली, “मला काहीही झाल्यास…”

डॅक्स शेपर्डच्याआर्मचेअर एक्सपर्ट’ या पॉडकास्टमध्ये मुलाखतीदरम्यान प्रियांकाने ‘आरआरआर’ हा तमिळ चित्रपट असल्याचा उल्लेख केला होता. डॅक्स शेपर्डने ‘आरआरआर’ला बॉलिवूड चित्रपट म्हटलं होतं. त्याची चूक दुरुस्त करताना प्रियांकाने तो बॉलिवूड नाही तर तमिळ चित्रपट असल्याचे सांगितले. पण, ‘आरआरआर’ हा तेलुगू चित्रपट आहे.