अभिनेत्री प्रियांका चोप्राने २०१८ साली अमेरिकन गायक निक जोनासशी लग्न केलं होतं. निक तिच्यापेक्षा १० वर्षांनी लहान आहे, त्यामुळे प्रियांका चोप्राला कायम ट्रोल केलं जातं. गेल्यावर्षी प्रियांका-निक एका मुलीचे पालक झाले आहेत. त्यांनी सरोगसीद्वारे त्यांची मुलगी मारी मालतीचं स्वागत केलं होतं. पण त्यावरून प्रियांकावर खूप टीका केली गेली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रियांकाने अलीकडेच पती निक जोनासचं वय आणि सरोगसीद्वारे आई झाल्याने होणाऱ्या टीकेला उत्तर दिलं. ‘ब्रिटीश वोग’शी बोलताना ती म्हणाली, “निक जरी माझ्यापेक्षा १० वर्षांनी लहान असला तरी तो त्याच्या वयापेक्षा जास्त समजदार आहे. तो मला आयुष्यात स्थिर राहण्यास मदत करतो आणि मला माझ्या मुल्यांची वारंवार आठवण करून देतो.”

Video: घरातील श्वानाने आणल्या अनंत-राधिकाच्या अंगठ्या; तर, अंबानी कुटुंबाने रणबीर आलियाच्या ‘देवा-देवा’ गाण्यावर धरला ठेका

मुलीबद्दल बोलताना प्रियांका म्हणाली, “जेव्हा लोक माझ्याबद्दल काही बोलतात, तेव्हा मी स्वतःला मजबूत बनवते. पण जेव्हा लोक माझ्या मुलीबद्दल बोलतात तेव्हा मला खूप त्रास होतो. माझ्या मुलीला या सगळ्यांपासून दूर ठेवा. मालतीचा जन्म झाला तेव्हा ती ऑपरेटिंग रूममध्ये होती. ती माझ्या हाताच्या तळव्यांपेक्षाही लहान होती. अतिदक्षता वॉर्डमध्ये नर्स काय करतात, ते मी त्यावेळी पाहिलं. डॉक्टर जेव्हा तिच्या लहान लहान शिरा शोधण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा मी तिचे छोटे हातात माझ्या हातात धरले होते. तेव्हा मला कसं वाटत होतं, ते मला माहीत आहे. त्यामुळे ती कुठल्याही गॉसिपचा भाग बनणार नाही. मी माझ्या आयुष्याच्या या चॅप्टरबद्दल आणि माझ्या मुलीबद्दल खूप प्रोटेक्टिव्ह आहे. कारण लोक जे बोलतात ते फक्त माझ्याबदद्लच नाही, तर तिच्या आयुष्याबद्दलही बोलतात.”

सरोगसीद्वारे आई होण्यावरून प्रियांकावर खूप टीका झाली. त्याबद्दलही तिने भाष्य केलं. “काही वैद्यकीय कारणांमुळे मी आई होऊ शकत नव्हते. त्यामुळे आमच्याजवळ सरोगसी हाच बाळासाठी पर्याय होता. हा माझ्या आयुष्यातील एक अतिशय महत्त्वाचा टप्पा होता. मी खूप भाग्यवान समजते की मला सरोगसीद्वारे आई होता आलं. मी माझ्या सरोगेटची देखील आभारी आहे, तिने आमच्या बाळाची सहा महिने काळजी घेतली,” असं प्रियांका म्हणाली.

दरम्यान, प्रियांकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास ती सध्या तिच्या आगामी ‘लव्ह अगेन’ या हॉलिवूड चित्रपटामुळे चर्चेत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka chopra reacts on trolling around daughter malti marie birth says my daughter will not be gossip hrc