प्रियांका चोप्राने बॉलीवूडप्रमाणे हॉलीवूडमध्येही आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवला आहे. अलीकडेच प्रियांकाचा ‘मेट गाला २०२३’चा लूक चर्चेचा विषय ठरला होता. ‘हॉवर्ड स्टर्न’ या अमेरिकन रेडिओ शोमध्ये हजेरी लावत प्रियांकाने तिच्या दिवंगत वडिलांविषयीच्या अनेक आठवणींना उजाळा दिला आहे.

हेही वाचा : “प्रत्येक कलाकाराने…” अमृता खानविलकरबद्दल आशिष पाटीलने मांडले मत

प्रियांका १२ वर्षांची असताना अमेरिकेला गेली होती. परंतु अमेरिकेहून भारतात आल्यावर तिच्या जीवनशैलीत संपूर्ण बदल झाला असल्याचे तिने सांगितले. प्रियांका म्हणाली, १६ व्या वर्षी भारतात परतल्यावर माझ्यामध्ये अमेरिकन जीवनशैलीप्रमाणे बदल झाले होते. हे बदल माझ्या वडिलांना अजिबात पसंत नव्हते. एकदा तर एक मुलगा रात्री पाठलाग करीत थेट आमच्या बाल्कनीपर्यंत पोहोचला होता. यानंतर वडिलांनी खिडकीला दार लावून घेतले आणि तिचे सगळे वेस्टर्न कपडे जप्त केले होते. तिच्याकडून सगळ्या जीन्स जप्त केल्या आणि भारतीय ड्रेस घालण्यास सांगितले.

प्रियांका पुढे म्हणाली, मी तेव्हा माझ्या वडिलांना समजू नाही शकले. पण आज जेव्हा मी विचार करते तेव्हा मला त्या गोष्टीचे गांभीर्य कळते. त्या मुलाला बाल्कनीमध्ये बघून मी जोरात किंचाळले होते. त्यानंतर तो मुलगा तिकडून निघून गेला परंतु दुसऱ्याच दिवशी वडिलांनी मला सांगितले तुला आयुष्य जगण्यासाठी आता नियमांची आवश्यकता आहे. यामुळेच आज माझे करिअर घडले आहे.

Story img Loader