अभिनेत्री प्रियांका चोप्रा 15 महिन्यांची मुलगी मालती मेरी जोनासची आई आहे. ती आपल्या व्यग्र शेड्यूलमधून वेळ काढत मालती मेरीबरोबर वेळ घालवते. प्रियांकाला आधीपासूनच लहान मुलं खूप आवडायची, त्यामुळे तिला आई व्हायचं होतं. या इच्छेमुळेच तिने वयाच्या ३०व्या वर्षी बीजांड गोठवले. पण, प्रियांकासाठी ही प्रक्रिया सोपी नव्हती, कारण त्यावेळी ती टीव्ही शो ‘क्वांटिको’साठी चित्रीकरण करत होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा –प्रियांका चोप्राने ३०व्या वर्षी केलेले Eggs Freeze; आता खुलासा करत म्हणाली, “माझ्या आईने…”

प्रियांकाने एग्ज फ्रीज करण्याची म्हणजेच बीजांड गोठवण्याची प्रक्रिया किती कठीण होती, याबद्दल खुलासा केला. ‘अनरॅप्ड पॉडकास्ट’मध्ये बोलताना प्रियांका म्हणाली, “जेव्हा मी तिशीत होते, तेव्हा मी एग्ज फ्रीज करण्याचा निर्णय घेतला. मी त्यावेळी ‘क्वांटिको’चे चित्रीकरण करत होते. ती प्रक्रिया खूप वेदनादायी होती. महिनाभर तुम्हाला स्वतःलाच अनेक इंजेक्शन्स द्यावी लागतात. हॉर्मोनल चढ-उतार होतात, त्यामुळे तुम्हाला वेड्यासारखं वाटतं. शिवाय पोटात गोळा आल्यासारखं वाटायचं.”

हेही वाचा – “मी तिला खूप वेळा गमावणार होते”; लेक मालतीबद्दल प्रियांका चोप्राचा खुलासा, म्हणाली, “ती १०० दिवस…”

ही प्रक्रिया कठीण असली तरी प्रियांकाला ती करायची होती. “मी त्यावेळी चित्रीकरण करत होते, पण मला ते फक्त माझ्यासाठी करायचं होतं. ही प्रक्रिया महाग आहे, त्यामुळे त्यासाठी खूप बचत करावी लागते. पण ज्या नोकरी करणार्‍या महिला, अविवाहित स्त्रिया किंवा ज्यांना मुलं हवी आहेत, पण त्या श्योर नाहीत, अशा महिला आहेत, त्या ही प्रक्रिया करून घेऊ शकतात,” असं प्रियांकाने सांगितलं.

“मी गेल्यावर माझा एक भाग या जगात राहावा, अशी माझी इच्छा होती,” असं प्रियांका म्हणाली. यासाठी तिने स्त्री-रोग तज्ज्ञ असलेल्या आई मधु चोप्राचा सल्ला घेतला. तिची आई तिला म्हणाली की तुला ज्या पार्टनरकडून मुलं हवी असतील, त्याला तू कधी भेटशील, लग्न कधी करशील याबद्दल माहीत नाही. त्यामुळे देवाने तुला व तुझ्या शरीराला मुलं जन्माला घालण्याची क्षमता दिली आहे तर तू एग्ज फ्रीज करायला हवेत. दरम्यान, प्रियांकाने एका मैत्रिणीचा सल्लाही घेतला होता, जिने तिचे एग्ज फ्रीज केले होते.

प्रियांका चोप्राने अमेरिकन गायक निक जोनासशी लग्न केले आहे. त्यांनी मालती मेरी नावाची मुलगी आहे. तिचा जन्म जानेवारी २०२२ मध्ये सरोगसीद्वारे झाला होता.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka chopra reveals she froze her eggs while filming quantico shares insane feeling hrc