बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा ही आता ग्लोबल स्टार झाली आहे. नुकतंच प्रियांका चोप्रा ही सहकुटुंब भारतात परतली आहे. प्रियांका ही तिचा पती निक जोनस आणि मुलगी मालती मेरी चोप्रा यांच्याबरोबर भारतात परतली आहे. तिचा एक व्हिडीओही समोर आला आहे. मालतीची ही पहिलीच भारतभेट होती. मालतीची एक झलक पाहण्यासाठी प्रियांकाच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. चाहते नेहमीच मालतीबद्दल जाणून घेण्यास उत्सुक असतात. नुकतचं प्रियांकाने एका मुलाखतीत आपली लेक मालतीबाबत एक खुलासा केला आहे.

हेही वाचा- VIDEO : सलमान खान बनला अनंत अंबानींचा बॅकग्राऊंड डान्सर; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले..

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Priya Berde
प्रिया बेर्डे यांना भविष्यात साकारायचीय ‘ही’ व्यक्तिरेखा, म्हणाल्या, “माझ्या आईने…”
Tula Shikvin Changlach Dhada Fame Actress Virisha Naik mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई; ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो

प्रियांका म्हणाली की तिची मुलगी मालती मेरी चोप्रा जोनास ही खरी चोप्रा आहे. प्रियांकाने सांगितले की, तिच्या मुलीला भारतीय जेवण खूप आवडते. मालतीला पनीर मटर आणि बिर्याणी आवडते. मालती दिसायला विदेशी असली तरी मनाने ती पूर्णपणे देशी आहे. मालतीला मसालेदार पदार्थ आवडतात.

डेक्स शेफर्डचा पॉडकास्ट या शोममध्ये बॉलिवूडमधील राजकारणावर भाष्य केल्याने प्रियांका चर्चेत आली. या राजकारणाला कंटाळूनच बॉलिवूड सोडून हॉलिवूडमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचा खुलासा केला होता. यावर बॉलिवूडमधील बऱ्याच कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा- गीगी हदीदच्या कमरेवर बोनी कपूर यांनी ठेवला हात; फोटो पाहून नेटकरी भडकले, म्हणाले, “काका…”

काही दिवसांपूर्वी प्रियांका ही भारतात परतली. त्यानंतर तिने ‘नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र’ च्या उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावली होती. तर दुसरीकडे प्रियांका ही तिच्या आगामी ‘सिटाडेल’ या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहे. नुकतंच प्रियांकाने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या कामाच्या पद्धतीबद्दल सांगितले. तसेच ती तिच्या कामाचे निकष कसे ठरवते याबद्दलही तिने भाष्य केले. प्रियांकाने नुकतंच तिचा सहकलाकार रिचर्ड मेडनबरोबर एका पत्रकार परिषदेला हजेरी लावली. यावेळी तिला सिनेसृष्टीबद्दल, तिच्या कामाबद्दल प्रश्न विचारण्यात आले. त्यावर तिने मनमोकळेपणाने भाष्य केले.

Story img Loader