‘जी ले जरा’ या चित्रपटाची गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा सुरु आहे. चित्रपटातून अभिनेत्री कतरिना कैफ, आलिया भट्ट आणि प्रियांका चोप्रा पहिल्यांदाच एकत्र दिसणार असल्याची घोषणा दिग्दर्शक फरहान अख्तरने केली होती.  या तिघी दमदार अभिनेत्री पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार असल्याने प्रेक्षकही खूप उत्सुक होते. पण काही दिवसांपूर्वीच प्रियांका चोप्रा हिने या चित्रपटातून माघार घेतली. तर आता याचं कारण समोर आलं आहे.

काही दिवसांपूर्वीच जी ले जरा या चित्रपटाला प्रियंका चोप्राने नकार दिल्याचं समोर आलं. त्यानंतर तिच्या या एक्झिटची बरीच चर्चा रंगली. प्रियांका चोप्राला या चित्रपटाची स्क्रिप्ट आवडली नाही आणि त्यावरून तिचे दिग्दर्शक निर्मात्यांची मतभेद झाल्यामुळे ती या चित्रपटातून बाहेर पडली असं बोललं जात होतं. पण आता या मागचं खरं कारण समोर आलं आहे.

Manmohan Singh is the second Prime Minister to visit Deekshabhoomi after Atal Bihari Vajpayee
अटलबिहारी वाजपेयींनंतर दीक्षाभूमीला भेट देणारे डॉ. मनमोहन सिंग दुसरे पंतप्रधान होते
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
A young man was brutally beaten to death due to an immoral relationship in Nagpur
विवाहित प्रेयसीची अंधारातील भेट प्रियकराच्या जीवावर बेतली
prarthana behere shares emotional post as demise of her brother
“तू अचानक निघून गेलास…”, जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर अभिनेत्री प्रार्थना बेहेरेची भावुक पोस्ट
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”

आणखी वाचा : गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी केला गेला होता प्रियांका चोप्राच्या नावाचा विचार, कारण वाचून व्हाल थक्क

‘हिंदुस्थान टाइम्स’च्या वृत्तानुसार, प्रियांकाने या चित्रपटातून माघार घेण्याचं खरं कारण हे शेड्युल आहे. पुढील काही महिन्यातील प्रियांकाचं वेळापत्रक खूप व्यग्र आहे. प्रियांकाबरोबरच आलिया आणि कतरिनाही आपापल्या कामांमध्ये बिझी असल्यामुळे त्यांना या चित्रपटासाठी एकत्र तारखा देता येत नाहीयेत. म्हणून या चित्रपटाचा शूटिंग लांबणीवर जात आहे. चित्रपटाचे शूटिंग रखडल्यामुळे प्रियांकाने या चित्रपटाला नकार दिला आहे.

हेही वाचा : काय सांगता! प्रियांका चोप्राच्या लेकीच्या हातात महागडी पर्स, किंमत वाचून व्हाल थक्क

दरम्यान, आता प्रियांकाच्या जागी या चित्रपटामध्ये कोण अभिनेत्री दिसणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. हा चित्रपट फिरायला गेलेल्या तीन मैत्रिणींवर आधारित आहे.

Story img Loader