बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झाली आणि ती सध्या हॉलिवूडमध्ये काम करत आहे. अचानक तिने तिकडे स्थायिक होण्याचा आणि हॉलिवूडमध्ये काम करण्याचा घेतलेला निर्णय हा अनेकांना धक्का देणारा होता, पण यामागचं कारण मध्यंतरी तिने स्पष्ट केलं होतं. बॉलिवूडमधील एकूण राजकारण, कंपूशाही अशा वेगवेगळ्या गोष्टींना कंटाळल्याने प्रियांकाने हॉलिवूडमध्ये जायचा निर्णय घेतला असं तिने नुकतंच स्पष्ट केलं होतं.
आता पुन्हा एका अशाच वक्तव्यामुळे ती चर्चेत आली आहे. आता तिने समान मानधन आणि खासगी आयुष्यातील काही अनुभवांबद्दल खुलासा केला आहे. प्रियांकाला मिळालेल्या यशावर खार खाणारे शिवाय तिच्या यशाचं कौतुक करणारे बरेच पुरुष तिच्या आयुष्यात असल्याचा खुलासा तिने केला आहे. प्रियांकाला मिळालेली प्रसिद्धी पाहून बऱ्याच पुरुषांना असुरक्षित वाटतं असंही तिने सांगितलं आहे.
‘एएनआय’शी संवाद साधताना प्रियांका म्हणाली, “माझ्या आयुष्यात असे बरेच पुरुष आहेत ज्यांना माझ्या कामगिरीबद्दल अभिमान वाटतो तर काही पुरुष असेही आहेत ज्यांना मला मिळालेलं यश पाहून असुरक्षित वाटतं. पुरुषांनी त्यांचं स्वातंत्र्य आणि घरातील कर्ता पुरुष म्हणून मिळणारा मान उपभोगला आहे. हेच जर एका स्त्रीने केलं किंवा एखादी स्त्री काम करत असेल आणि पुरुष घरी बसला असेल तर लगेच त्यांना असुरक्षित वाटत आहे. कधी स्त्रियांनासुद्धा हे श्रेय द्यावं, ही संधी द्यावी हे आपण आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे. माझ्या वडिलांनीही हेच केलं आहे. आज जेव्हा मी रेड कारपेटवर माझ्या पतीसह येते तेव्हा तो स्वतः बाजूला होतो, मला याचा खूप अभिमान आहे की माझ्या आजूबाजूला असे पुरुष आहेत ज्यांना मला मिळणारी प्रसिद्धी पाहून असुरक्षित वाटत नाही.”
आपल्या आगामी ‘सिटाडेल’ या वेबसीरिजच्या प्रमोशनदरम्यान प्रियांकाने हे वक्तव्य केलं आहे. प्रियांकाची ही वेबसीरिज २८ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. भारतातही प्रियांकाने या वेबसीरिजचं जबरदस्त प्रमोशन केलं. याबरोबरच फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’मध्येही प्रियांका झळकणार आहे. या चित्रपटात प्रियांका प्रथमच कतरिना कैफ आणि आलिया भट्टसह स्क्रीन शेअर करणार आहे.