अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही विविध आघाड्यांवर कार्यरत आहे. अभिनेत्री म्हणून, व्यवसायिका म्हणून ती उत्तम कामगिरी करत आहे. ती तिच्या नवऱ्याबरोबर म्हणजेच निक जोनसबरोबर अमेरिकेत राहते. प्रियांका सोशल मीडियावर फार सक्रिय आहे. ती पोस्ट केलेल्या फोटो आणि व्हिडीओंच्या माध्यमातून तिच्या व तिच्या जवळच्या व्यक्तींच्या आयुष्याबद्दलचे अपडेट्स देत असते.

आणखी वाचा : चित्रपटगृहानंतर ओटीटीवरील शर्यतीतही ‘लाल सिंग चड्ढा’ पडला मागे, ‘हे’ आहे कारण

Meet Brothers Who Started Business With Only Rs 50000 During Pandemic Appeared On Shark Tank Season 3
भावंडाची कमाल! करोना काळात फक्त ५० हजारात सुरु केला व्यवसाय, शार्क टँकमध्ये आल्यानंतर उभारली १०० कोटींची कंपनी
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
makar sankranti 2025 til gul ladoo recipe in marathi easy til ladoo recipe for sankranti
तिळगुळ घ्या गोड गोड बोला! ‘या’ मकरसंक्रांतीला बनवा परफेक्ट तिळाचे लाडू, लिहून घ्या सीक्रेट रेसिपी
Makar Sankranti Special: Easy Khichdi Recipe
Makar Sankranti Special Khichdi : मकर संक्रांतीला अशी बनवा चविष्ठ खिचडी, एका क्लिकवर जाणून घ्या ही सोपी रेसिपी
gul poli
“तिळगुळ घ्या, गोड गोड बोला!” संक्रातीनिमित्त झटपट बनवा खमंग खुसखुशीत तिळाची पोळी! ही घ्या रेसिपी
aishwarya narkar faces trolling for wearing sleeveless blouse
स्लिव्हलेस ब्लाऊजमुळे शिव्या घातल्या, संस्कृती दाखवली…; ऐश्वर्या नारकरांनी ट्रोलर्सना विचारला जाब, ‘तो’ अनुभव सांगत म्हणाल्या…
Loksatta book batmi John Baxter Paris
बुकबातमी: जॉन बॅक्स्टरचे पॅरिस…
Marathi actor Siddharth chandekar nickname revealed his mother seema chandekar
सिद्धार्थ चांदेकरचं टोपण नाव माहितीये का? आई सीमा चांदेकरांनी केला खुलासा, म्हणाल्या, “त्याचा जेव्हा जन्म झाला…”

न्यूयॉर्क या शहरामध्ये काही महिन्यांपूर्वी तिने ‘सोना’ नावाचे रेस्टॉरंट सुरु केले आहे. आतापर्यंत अनेकदा तिने या रेस्टॉरंटच्या काही गोष्टी चाहत्यांबरोबर शेअर केल्या आहेत. पण आता पाहिल्यांदाच ती चाहत्यांना या रेस्टॉरंटच्या किचनमध्ये घेऊन गेली. प्रियांका चोप्राने भारतीय आणि फ्यूशन डिश बनविणाऱ्या शेफशी संवाद साधला आणि प्रियांकाने काही वेळ हे पदार्थ बनविण्यात सहभागही घेतला.

या व्हिडिओत प्रियंका तिच्या चाहत्यांना ‘सोना’च्या किचनमध्ये घेऊन जात सुरुवातीला तेथील शेफ्सशी ओळख करून देतेय. त्यानंतर “काय चाललंय इथे? मला तुमच्याइतके चांगले पदार्थ बनवता येणार नाहीत पण मलाही तुमच्यात सहभागी करून घ्या,” असं म्हणत ती शेफ्सने बनवलेले गरमागरम कबाब, पिझ्झा आणि काही पदार्थांची चव घेताना दिसतेय. तसेच ‘सोना’मध्ये मिळणाऱ्या भेळ, सॅलेड अशा पदार्थांचीही झलक चाहत्यांना दाखवतेय. व्हिडीओच्या शेवटी “हे सगळे पादार्थ अत्यंत चविष्ट आहेत, तुम्ही ग्रेट आहात…” असं म्हणत तिने दोन्ही शेफ्सचे कौतुकही केलेले आहे.

हा व्हिडीओ शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले, “@sonanewyork च्या किचनची पडद्यामागील काही दृष्य… मला इथल्या अनेक गोष्टी आवडतात हे स्पष्ट आहे. सर्व चविष्ट खाद्यपदार्थांसाठी @harinayak आणि @harry.nair तुमचे खूप खूप आभार. तुम्हाला माहीत आहे की मी लवकरच परत येईन!”

हेही वाचा : प्रियांका चोप्रा आणि अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस यांची ग्रेट भेट, ‘या’ विषयांवर केली चर्चा

प्रियांकाच्या या रेस्टॉरंटला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. न्यू यॉर्कमध्ये जाणारे प्रियांकाचे चाहते आवर्जून या रेस्टॉरंटला भेट देतात. तसेच सोशल मीडियावरवरही या रेस्टॉरंटबद्दल जाणून घेण्यासाठी प्रियांकाचे चाहते उत्सुक असतात. तिच्या या व्हिडीओवर कमेंट्स करत चाहत्यांनी या रेस्टॉरंटला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच अनेकांनी तिला भारतातही असे एखादे रेस्टॉरंट सुरु करण्याचे सुचविले आहे.

Story img Loader