बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री म्हणून प्रियांका चोप्राला ओळखले जाते. प्रियांका चोप्रा आणि निक जोनस हे काही महिन्यांपूर्वी सरोगसीच्या माध्यमातून आई-बाबा झाले. त्यांनी सोशल मीडियावर याबाबतची गुडन्यूज चाहत्यांना दिली होती. बाळाची गुडन्यूजनंतर सर्वत्र तिच्या बाळाची चर्चा सुरु होती. प्रियांका चोप्राच्या मुलीची एक झलक पाहण्यासाठी सर्वजण फार उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे. आता तिने पुन्हा एक फोटो शेअर केला आहे.

प्रियांका चोप्रा ही सध्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. सध्या ती तिच्या तिची मुलगी मालती मेरी चोप्रा जोनासबरोबर वेळ घालवताना दिसत आहे. नुकतंच प्रियांकाने तिच्या लेकीचा एक गोंडस फोटो शेअर केला आहे. प्रियांकाने पहाटेच मालतीचा एक फोटो शेअर केला आहे. यात मालती मेरी ही झोपल्याचे दिसत आहे.
आणखी वाचा : “पण माझ्या डोक्यात हवा…” ‘इंडियन आयडल’ विजेता अभिजीत सावंत स्पष्टच बोलला

Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
bride told love story through ukhana
“पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हटले ..” उखाणा घेत नवरीने सांगितली भन्नाट लव्हस्टोरी, VIDEO एकदा पाहाच
A young man was brutally beaten to death due to an immoral relationship in Nagpur
विवाहित प्रेयसीची अंधारातील भेट प्रियकराच्या जीवावर बेतली
girl bedroom
“माझ्या बेडरुममध्ये…”, जेईईचा अभ्यास करणाऱ्या मुलीवर पाळत ठेवण्याकरता पालकांचा ‘हा’ निर्णय तुम्हाला पटतो का?
prarthana behere shares emotional post as demise of her brother
“तू अचानक निघून गेलास…”, जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर अभिनेत्री प्रार्थना बेहेरेची भावुक पोस्ट
two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
Girl claims her bf to be in Delhi Police, tries to threaten fellow passenger during altercation on metro
“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral

या फोटोत, मालती मेरी चोप्रा जोनास बेबी स्ट्रॉलरच्या आत एका बाजूला झोपली आहे. यावेळी तिच्या अंगावर पांढऱ्या रंगाचं स्वेटर आणि गुलाबी टोपी पाहायला मिळत आहे. त्याबरोबर तिच्याभोवती शाल गुंडाळल्याचे दिसत आहे. यात प्रियांकाच्या लेकीचा चेहरा हा स्पष्ट दिसत नसला तरी अर्धा दिसत आहे.

यापूर्वी प्रियांकाने तिच्या मुलीच्या चेहरा हृदयाच्या इमोजीने तिचा चेहरा लपवायला होता. तिने तिच्या अनेक फोटोत तिचा चेहरा उघड केला नव्हता. मात्र आता तिने मालतीचा फोटो शेअर करत अर्धा चेहरा उघड केला. पण तिचे डोळे आणि कपाळ मात्र उबदार टोपीने झाकल्याचे पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा : फॅन्सचा फेव्हरेट स्पॉट असलेल्या ‘मन्नत’ नेम प्लेटसमोर गौरी खानने काढला फोटो; डायमंड नेम प्लेटमागील खरं कारणही सांगितलं

या फोटोत तिचा चेहरा स्पष्ट दिसत नसल्याने तिचे चाहते नाराज झाले आहेत. प्रियांकावर आणि तिच्या लेकीवर प्रेमाचा वर्षाव होत आहे. या फोटोला तिने फारच हटके कॅप्शन दिले आहे. “मला म्हणायचंय…” असे तिने यात म्हटले आहे.

मालतीने अनेक लोकांनी कमेंट करत या चिमुकलीवर प्रेमाचा वर्षाव केला. “ओह शेवटी…इतकी सुंदर बाळ” अशी कमेंट एका व्यक्तीने केली आहे. तर काहींनी “सुंदर राजकुमारी” “ती खूप सुंदर आहे” असेही म्हटले आहे.

Story img Loader