प्रियांका चोप्राची जाऊ सोफी टर्नर व जो जोनस यांनी घटस्फोटाची घोषणा केली आहे. लग्नानंतर चार वर्षांनी दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. सोफी व जो जोनस यांच्यादरम्यान मुलींच्या कस्टडीवरून वाद सुरू आहे. अशातच आता सोफीची प्रियांकाबाबत बातमी समोर आली आहे. सोफी व प्रियांका दोघींनी इन्स्टाग्रामवर एकमेकींना अनफॉलो केलं आहे.
खरं तर प्रियांका व सोफी दोघींचं खूप छान जमायचं. दोघी अनेकदा एकमेकींबरोबरचे फोटोही शेअर करायच्या. पण सोफी व जोच्या घटस्फोटानंतर गोष्टी बदलल्या आहेत. मुलींच्या कस्टडीवरून दोघांमध्ये सुरू असलेल्या वादाचं निरसन व्हावं, यासाठी प्रियांका प्रयत्न करत असल्याची माहिती समोर आली आहे. आता प्रियांका व सोफी यांनी इन्स्टाग्रामवरून एकमेकींना अनफॉलो केलंय. पण सोफी जोचा भाऊ केविन व त्याची पत्नी डॅनियल जोनसला फॉलो करत आहे.
प्रियांका व सोफी दोघीही अनेक वर्षांपासून चांगल्या मैत्रिणी आहेत. प्रियांकाला जो आणि सोफी टर्नरच्या मुली विला आणि डेल्फीन देखील खूप आवडतात. दरम्यान, निक-प्रियंका व सोफी आणि जो हे लंडनमध्ये राहायला जाणार होते, पण त्यापूर्वीच जो व सोफीने घटस्फोटाची घोषणा केली.
जो जोनस आणि सोफी टर्नर एकमेकांना २०१६ मध्ये भेटले होते. त्यांनी २०१७ मध्ये एंगेजमेंट केली व २०१९ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांना दोन मुली आहेत. २०२० मध्ये त्यांना पहिली मुलगी झाली आणि २०२२ मध्ये दुसरी मुलगी झाली. लग्नानंतर चार वर्षांनी ते दोघेही वेगळे होत आहेत.