हसन मिन्हाज हा तरुण पिढीतील आघाडीचा स्टॅण्डअप कॉमेडियनन म्हणून ओळखला जातो. त्याचा चाहतावर्ग जगभर पसरला आहे. त्याच्या व्हिडीओंमधून तो अनेक प्रसिद्ध व्यक्तींवर विनोद करत प्रेक्षकांना हसवत असतो. परंतु मध्यंतरी केलेला एक विनोद त्याला चांगलाच भोवला आहे. विनोदाच्या नावाखाली त्याने नोबेल पारितोषिक विजेती मलाला युसूफझाईची खिल्ली उडवली होती. त्यावर अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने सोशल मीडियावर सर्वांसमक्ष त्याला अद्दल घडवली आहे.
आणखी वाचा : “मी करीनाची १२-१४ तास वाट पाहिली पण…”, बॉलिवूडमधील घराणेशाहीच्या मुद्द्यावर तुषार कपूरचा धक्कादायक खुलासा
हसन मिन्हाजने अलीकडेच एक स्टँडअप कॉमेडीचा व्हिडीओ पोस्ट केला होता. त्या व्हिडीओत मलाला इन्स्टाग्रामवर त्याला फॉलो करते, परंतु तो तिला फॉलो बॅक करणार नाही, असे त्याने म्हटले होते. हा व्हिडीओ मलालापर्यंत पोहोचल्यावर त्याने हसनला अनफॉलो केले होते. आता प्रियांका चोप्रानेही हसनला इन्स्टाग्रामवर अनफॉलो करून मलालाला पाठिंबा दिला आहे. इतकंच नाही तर प्रियांकाने हसन मिन्हाजला ‘छोट्या विचारांचा’ माणूस म्हणून संबोधले आहे.
याची सुरुवात हसन मिन्हाजच्या इंस्टाग्राम पोस्टने झाली होती. पण आता त्याने एक नवीन व्हिडीओ पोस्ट करत “गोष्टी आता हाताबाहेर जात आहेत…” अशी कॅप्शन लिहिली आहे. या नवीन व्हिडीओमध्ये हसन म्हणतो, ‘४ ऑक्टोबरला मी नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसूफझाईची खिल्ली उडवली. मी म्हणालो की ती मला इन्स्टाग्रामवर फॉलो करते आणि मी तिला फॉलो करत नाही. त्यानंतर ५ ऑक्टोबरला या व्हिडीओचा बदला म्हणून तिने इंस्टाग्रामवर एक पोल घेतला. त्यात तिने लोकांना “मी याला अनफॉलो करू का?” असा प्रश्न विचारला आणि नंतर मला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले.”
पुढे तो म्हणाला, “मला माफ कर मलाला, मला फॉलो कर. पण मी तुला परत फॉलो करेन की नाही हे मला माहित नाही. त्यासाठी मी एक छोटा माणूस आहे.”
हेही वाचा : प्रियांका चोप्रा आणि अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस यांची ग्रेट भेट, ‘या’ विषयांवर केली चर्चा
आता हसन मिन्हाजच्या या व्हिडीओवर पलटवार करत प्रियंका चोप्राने मलालाला पाठिंबा दिला आहे. प्रियांकाने इंस्टाग्राम स्टोरीवर एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने हसन मिन्हाजला अनफॉलो केल्याचे दिसत आहे. ही स्टोरी पोस्ट करताना प्रियांकाने लिहिले आहे, “तीच मुलगी, तीच मलाला! हसनने स्वतः विनोदी होण्यापेक्षा त्याच्या छोट्या विचारसरणीला महत्त्व दिले.”
घडल्या प्रकारानंतर अनेकांनी हसनवर टिका केली. विशेष म्हणजे त्याच्या चाहत्यांनीही त्याला चार शब्द सुनावले. एकाने ट्विटरवर लिहिले, “नेटफ्लिक्सचा पुढील कार्यक्रम आता ‘हसन मिन्हाज: छोट्या विचारसरणीचा राजा’ असा असेल.” तर दुसऱ्याने लिहिले, “मला तुमची विनोदबुद्धी जितकी आवडते, तितकेच तुम्ही केलेले कृत्य वाईट होते.”