अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या तिच्या सुखी संसारामध्ये रमली आहे. लग्नानंतर परदेशात स्थायिक झालेली प्रियांका मध्यंतरी पती निक जोनस व मुलगी मालतीसह भारतात आली होती. भारतात आल्यानंतर पहिल्यांदाच तिने लेकीचा चेहरा दाखवला. प्रियांका काही दिवसांसाठी मायदेशी परतली. पण तिला तिच्या चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिलं. सध्या प्रियांकाच्या हाती हॉलिवूडसह बॉलिवूड चित्रपटही आहेत. प्रियांकाने तिच्या आगामी चित्रपटांबाबत बोलताना मुलीबाबत केलेलं भाष्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

प्रियांका लेक मालतीला अगदी जीवापाड जपते. कामामधून वेळ काढत मालतीबरोबर ती एण्जॉय करताना दिसते. आता तर लेकीसाठी ती करिअर सोडायलाही तयार आहे. ‘मुव्ही सिटीज’ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिने याबाबत भाष्य केलं. प्रियांकाने म्हटलं की, “करिअरचा त्याग करणं असो वा देश सोडणं असो मुलीसाठी मी या दोन्ही गोष्टी करण्यास तयार आहे”.

Gashmeer Mahajani
“परत तिच्या कुशीत…”, गश्मीर महाजनी आईबद्दल बोलताना म्हणाला, “घरी दोन लहान मुलं…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Image Of Supriya Sule And Ajit Pawar
Supriya Sule : “मी बोलते, पण अजित पवार माझ्याशी…”, पवार कुटुंबीयांतील दुराव्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान
Monika Dabade
डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात अभिनेत्री झाली भावुक; ‘ठरलं तर मग’च्या टीमबद्दल म्हणाली, “आतापर्यंत हे माझ्यादेखत…”
Pooja Sawant First Makar Sankranti Celebration
Video: पूजा सावंतने पतीबरोबर ऑस्ट्रेलियात साजरी केली पहिली मकर संक्रात; सासूबाई कमेंट करत म्हणाल्या…
juna akhara girl donate
Maha Kumbh: १३ वर्षांच्या मुलीला साध्वी होण्यासाठी केले दान; दीक्षा देणाऱ्या महंताची जुन्या आखाड्याने केली हकालपट्टी
Paaru
“तुम्ही पारूला सून म्हणून कधी स्वीकारणार आहात?”, श्रेया बुगडेच्या प्रश्नावर अहिल्यादेवी किर्लोस्कर म्हणाल्या…
Ruhi Chaturvedi blessed with baby girl
एकाच मालिकेतील तिसरी अभिनेत्री झाली आई, तिघींच्याही घरी मुलींचा जन्म, पोस्ट शेअर करून दिली आनंदाची बातमी

आणखी वाचा – गौरव मोरेला यंदाचा राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज गौरव पुरस्कार जाहीर, म्हणाला “संभाजी ब्रिगेडचा…”

“हा खूप मोठा त्याग आहे. मुलांसाठी त्याग करणारे आई-वडील मला मिळाले यासाठी मी स्वतःला खूप नशिबवान समजते. पण अजूनही असे काही आई-वडील आहेत जे आपल्या मुलींना सामाजिक दबावामुळे प्रोत्साहन देत नाहीत. मुलांचा सांभाळ करत असताना आई-वडिलांसह घरातील मंडळींनी एकत्र बसून एकमेकांशी संवाद साधला पाहिजे”.

आणखी वाचा – सिद्धार्थ जाधवने दाखवली डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनच्या घरातील वस्तूंची झलक, म्हणाला “माझा भीमराया…”

“महिलांचा सन्मान केला पाहिजे ही शिकवणही मुलांना दिली पाहिजे. शिवाय मुलींना स्वतःचा निर्णय स्वतः घेण्यासाठी सक्षम केलं पाहिजे”. प्रियांका तिच्या मुलीचा सांभाळ अगदी योग्य पद्धतीने करत आहे. तसेच मुलीसाठी प्रत्येक गोष्ट करण्यास ती तयार आहे हे तिच्या बोलण्यामधून स्पष्ट होतं.

Story img Loader