अभिनेत्री प्रियांका चोप्राची ‘सिटाडेल’ ही स्पाय थ्रिरल सीरिज अलीकडेच प्रेक्षकांच्या भेटीला आली. या सीरिजचे प्रमोशन करताना प्रियांकाने अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत, करिअर तसेच वैयक्तिक आयुष्याबाबत नवनवे खुलासे केले आहेत. “मी आयुष्यात अशा काही चुका केल्या, ज्यामुळे माझे करिअर उद्ध्वस्त झाले असते,” असा धक्कादायक खुलासा प्रियांकाने अमेरिकन रेडिओ शो ‘द हॉवर्ड स्टर्न’मध्ये केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : ‘गांधी गोडसे एक युद्ध’ चित्रपट फ्लॉप का ठरला? दिग्दर्शक म्हणाले, “पठाणच्या टीमने…”

प्रियांका चोप्राने ‘द हॉवर्ड स्टर्न’ शोमधील मुलाखतीत अनेक खुलासे केले आहेत. ती म्हणाली, “प्लास्टिक सर्जरी केल्यावर माझे जगणे कठीण झाले होते. नाकावर प्लास्टिक सर्जरी केल्यानंतर मला तीन चित्रपटांची ऑफर नाकारण्यात आली. हा माझ्या आयुष्यातील ‘डार्क फेज’ होता, कारण सर्जरी केल्यावर माझा चेहरा पूर्वीपेक्षा एकदम वेगळा दिसू लागला होता, यामुळे मी डिप्रेशनमध्ये गेले आणि माझे करिअर पणाला लागले.”

प्रियांका पुढे म्हणाली, “या वेळी माझ्या वडिलांनी मला खंबीरपणे पाठिंबा दिला. त्यांच्यामुळे मी त्या कठीण प्रसंगातून सावरले, वडिलांनी मला पुन्हा एकदा जगण्यासाठी हिंमत दिली. त्यांनी माझा हात पकडून माझ्यात असलेल्या आत्मविश्वासाची जाणीव मला करून दिली. नाही तर आज माझे करिअर उद्ध्वस्त झाले असते.”

हेही वाचा : डोसा शेफला तब्बल २८ लाख पगार! शशांक केतकर व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

‘गदर’ चित्रपटाच्या दिग्दर्शकांचे कौतुक करीत प्रियांकाने सांगितले, “सर्जरीनंतर मला तीन चित्रपटांतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता परंतु ‘गदर ‘चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा असे एकमेव होते की, त्यांनी मला त्यांच्या प्रोजेक्टमधून बाहेर केले नाही.” तसेच बॉलीवूडमध्ये मोठ्या प्रमाणात राजकारण केले जात होते त्यामुळेच हिंदी चित्रपटसृष्टी सोडण्याचा निर्णय घेतल्याचेही प्रियांकाने स्पष्ट केले.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka chopra talked about depression phase after nose surgery went bad sva 00