प्रियांका चोप्रा ही बॉलिवूडमधील सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रियांकाने वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी मिस वर्ल्डचा किताब जिंकून देशाचे नाव उंचावले होते. त्यानंतर तिने बॉलिवूड इंडस्ट्रीत प्रवेश केला. प्रियांका आज ग्लोबल स्टार आहे. बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंतच्या टॉप अभिनेत्रींमध्ये तिचे नाव घेतले जाते. दरम्यान, करिअरच्या सुरुवातीच्या दिवसातील प्रियांका चोप्रा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा- सुनील शेट्टींना त्यांच्या मुलांना भारतीय शाळेत पाठवायचं नव्हतं कारण…; अभिनेत्याने अनेक वर्षांनी केला खुलासा

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Priya Berde
प्रिया बेर्डे यांना भविष्यात साकारायचीय ‘ही’ व्यक्तिरेखा, म्हणाल्या, “माझ्या आईने…”
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…

सिमी गरेवाल यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर प्रियांका चोप्राचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सिमी गरेवाल यांच्या टॉक शो दरम्यानचा आहे. या व्हिडीओत मुलाखत सुरु होण्याअगोदर प्रियांका आणि सिमी गरेवाल गप्पा मारताना दिसत आहेत. प्रियांका सिमी यांना हे सांगताना दिसत आहे की, मुलगी होणे किती कठीण असते. प्रियांका म्हणते की, “माझी इच्छा आहे की मी एक मुलगा असावा. मी मुलगा असते तर मला काहीही करावे लागले नसते. फक्त एक जोडी जीन्स आणि टी-शर्ट घाला आणि चला.” यावर उत्तर देताना सिमी म्हणतात, “पण आजकाल लोक खूप काही करत आहेत”. प्रियांका म्हणते की, “पण जेवढं मुलींना करावं लागतं तेवढं मुलांना करावं लागतं नाही.”

प्रियांका चोप्राच्या वक्रफ्रंटबाबत बोलायचं झालं प्रियांकाची हॉलिवूड बेवसिरीज ‘सिटाडेल’ चांगलीच गाजली होती. या बेवसिरीजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. सिटाडेल नंतर प्रियांका ‘हेड्स ऑफ स्टेट’ या हॉलिवूड चित्रपटात झळकणार आहे. तर दुसरीकडे दिग्दर्शक फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ चित्रपटातून प्रियांकाने माघार घेतली आहे. या चित्रपटात कतरिना कैफ, आलिया भट्ट आणि प्रियांका चोप्रा पहिल्यांदाच एकत्र दिसणार होत्या. मात्र, आता प्रियांकाने या चित्रपटात काम कऱण्यास नकार दिला आहे. त्यामुळे ‘जी ले जरा’साठी प्रियांकाच्या ऐवजी नव्या अभिनेत्रीचा शोध घेण्यास निर्मात्यांनी सुरुवात केली आहे.

Story img Loader