बॉलिवूडचे स्टार किड्स सध्या चर्चेत आहेत. नव्वदच्या दशकात शाहरुख खान, सुनील शेट्टी, चंकी पांडे या अभिनेत्यांचे मुलं आज बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण करत आहेत. बॉलिवूड पार्टी असो किंवा हॅलोवीन पार्टी सगळीकडे चर्चा आहे ती स्टार किड्सची. आज बॉलिवूडमध्ये प्रत्येक अभिनेता आपल्याला मुलाला किंवा मुलीला लाँच करत आहे. अभिनेत्यांप्रमाणे अभिनेत्रींच्या मुलीदेखील बॉलिवूडमध्ये दाखल झाल्या आहेत.
स्व. अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.जान्हवी मिली या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या जान्हवी या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. जान्हवीचे वडील बोनी कपूर हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माते आहेत. त्यांनी आजवर अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. नुकतेच हे दोघे मीडियासमोर एकत्र आले. फोटोग्राफर लोकांनी त्यांच्याकडे फोटोसाठी मागणी केली. दोघांनी लगेच एकत्र येऊन फोटो काढले. बोनी कपूर यांनी मस्करीत फोटोग्राफर लोकांना विचारले ‘आम्ही दोघे भाऊ बहीण वाटतोय ना’? यावर फोटोग्राफर हसायला लागले.
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शकाने शेअर केला जुना फोटो, तुम्ही ओळखू शकता का?
या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी बोनी कपूर यांना चांगलेच ट्रोल केले आहे. एकाने लिहले आहे आजोबा आणि नातं वाटत आहात. तर काहींनी लिहलं आहे जान्हवी लाजत आहे. अनेकांनी त्यांना आजोबांची उपमा दिली आहे.
श्रीदेवी आणि बोनी यांनी १९९६ मध्ये लग्न केलं. त्यांची मोठी मुलगी म्हणजे जान्हवी कपूर आणि धाकटी म्हणजे खुशी कपूर. ‘सैराट’ या मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक आलेल्या ‘धडक’ या चित्रपटातून जान्हवीने फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केले. त्यानंतरही तिने ‘गुंजन सॅक्सेना’, ‘रुही’, ‘गुड लक जेरी’ अशा विविध चित्रपटातून कामं केली.