अक्षय कुमार सध्या त्याच्या चित्रपटांमुळे खूप चर्चेत आहे. अक्षयने ‘हेरा फेरी ३’मधून बाहेर पडण्याचं सांगितल्यानंतर त्याच्या चाहते दु:खी झाले आहेत. या चित्रपटात अक्षय ऐवजी कार्तिक आर्यनची या चित्रपटात एंट्री झाली आहे. दरम्यान, अक्षय कुमारबाबत आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दोन मोठ्या चित्रपटांचे सिक्वेलही आता त्याच्या हातातून निसटले आहेत.
आणखी वाचा : कार्तिक आर्यनवर प्रेक्षक नाराज, ‘शेहजादा’ चित्रपटाच्या टीझरवर प्रतिक्रिया देत म्हणाले…
‘बॉलिवूड हंगामा’च्या बातमीनुसार, अक्षय कुमारने भरमसाठ फीची मागणी केल्यामुळे निर्माता फिरोज नाडियाडवालाला कार्तिक आर्यनला साइन करण्यास सांगण्यात आले. ‘हेरा फेरी ३’ साठी अक्षयने ९० कोटी आणि चित्रपटाच्या नफ्यात काही वाटा मागितला होता. मात्र, कार्तिकने ३० कोटींमध्येच होकार दिला. दरम्यान, अक्षय कुमारने चित्रपटाच्या स्क्रिप्टवर खूश नसल्याने त्याला हेरा फेरीचा सिक्वेल नाकारावा लागला असं एका मुलाखतीत सांगितलं होतं. पण त्याच्या या विधानावर निर्माते खुश नाहीत.
हेही वाचा : “चित्रपटात कोणाला घ्यायचं…”; परेश रावल यांनी ‘हेरा फेरी ३’च्या कास्टिंगवर केलं भाष्य
एका सूत्राने ‘बॉलिवूड हंगामा’ला सांगितले की, “अक्षयने त्याचे मानधन कमी करण्यास नकार दिला. निर्मात्याचे नुकसान होत असताना केवळ अक्षय पैसे कमावतो हे योग्य नाही. त्यामुळे फिरोज नाडियादवाला यांना ‘हेरा फेरी ३’नंतर ‘आवारा पागल दीवाना २’ आणि ‘वेलकम ३’ हे चिटपटही बनवायचे आहेत. फिरोज यांनी याआधी अक्षय कुमारला हे स्पष्ट केले होते की या दोन्ही अतिशय रोमांचक सिक्वेलसाठी तो त्यांची पहिली पसंती आहे. पण ‘हेरा फेरी ३’ या चित्रपटावर अक्षय कुमारने केलेल्या वक्तव्यामुळे फिरोज निराश आणि दुखावले आहेत. फिरोज यांनी आता त्यांचे ड्रीम प्रोजेक्ट्स असलेल्या ‘आवारा पागल दीवाना २’ आणि ‘वेलकम ३’ मधूनही अक्षयला वागळण्याचा निर्णय घेतला आहे.” त्यामुळे ‘हेर फेरी ३’नंतर फिरोज नाडियादवाला यांची निर्मिती असलेल्या पुढील चित्रपटांमध्येही अक्षय दिसणार नाही.