बॉलिवूड निर्माता दिग्दर्शक करण जोहर त्याच्या खास टॉक शोमुळे सध्या चांगलाच चर्चेत आहे. ‘कॉफी विथ करण’ च्या सातव्या सीझनचे सगळे भाग ओटीटीवर प्रदर्शित होत आहेत. हा कार्यक्रम बॉलिवूड सेलिब्रिटी गॉसिपसाठी जास्त ओळखला जातो. चित्रपटसृष्टीतील कित्येक मान्यवर मंडळींनी या कार्यक्रमात हजेरी लावली आहे. या नव्या सीझनमध्येही कतरिना, विकी कौशलपासून समांथा, अक्षय कुमारपर्यंत कित्येक स्टार्सनी हजेरी लावली. पण या कार्यक्रमात अजूनही किंग खान शाहरुख खानने का हजेरी लावली नाही असा सवाल सोशल मीडियावर विचाररला जात आहे.

मध्यंतरी ‘डिअर जिंदगी’ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान शाहरुखने आलियाबरोबर या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यानंतर मात्र शाहरुखने करण जोहरपासून फारकत घेतल्याच्या अफवा समोर आल्या होत्या. या नवीन सीझनमध्ये तरी शाहरुखला बघायला मिळेल या आशेवर कित्येक प्रेक्षक होते, पण शाहरुखचं दर्शन काही झालं नाही. याबाबत नुकतंच करण जोहरने भाष्य केलं आहे.

आणखी वाचा : “मी अल्लाहच्या आदेशानुसार…” इस्लामसाठी आणखी एका अभिनेत्रीचा मनोरंजनसृष्टीला अलविदा, पोस्ट व्हायरल

बॉलिवूड हंगामाशी संवाद साधताना करण जोहरने खुलासा केला की, “हा सीझन १२ भागात संपवायचा होता ज्यात आम्ही २६ सेलिब्रिटीजना आमंत्रण दिलं. रणबीरने या कार्यक्रमात हजेरी लावणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे तरी मी त्याचं मन वळवण्याचा प्रयत्न करेन. पुढील सीझनमध्ये शाहरुख येईल अशी अपेक्षा आहे. शाहरुख या कार्यक्रमाचा एक अतूट हिस्सा आहे. त्यामुळे पुढील सीझनमध्ये तोही येईल अशी मी आशा करतो.”

करण जोहर निर्मित ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाला चांगलं यश मिळालं. टीका झाली पण तितकाच लोकांनी हा चित्रपट पसंतही केला. आता रणबीर त्याच्या आगामी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटाच्या कामात व्यस्त आहे. या चित्रपटात आलिया भट्ट, रणवीर सिंग, जया बच्चन, धर्मेंद्र, शबाना आजमी यांच्यासारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. पुढच्या वर्षाअखेरीस हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader