बॉलिवूडचा पुढील सुपरस्टार म्हणून ओळखला जाणारा रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा टीझर आणि दोन गाणी प्रदर्शित झाली आहेत व त्यांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. तेव्हापासूनच या चित्रपटाच्या ट्रेलरची लोक आतुरतेने वाट बघत आहेत. रणबीरच्या करिअरमधील हा सर्वात हिंस्त्र चित्रपट असणार आहे अशी चर्चा आहे. तसंच टीझरमध्येसुद्धा ती झलक आपल्याला पाहायला मिळाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रणबीरच्या ‘अ‍ॅनिमल’बरोबरच विकी कौशलचा ‘सॅम बहादुर’सुद्धा प्रदर्शित होणार आहे. नुकताच ‘सॅम बहादुर’चा ट्रेलर समोर आला असून प्रेक्षकांचा याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे १ डिसेंबरला बॉक्स ऑफिसवर जबरदस्त टक्कर पहायला मिळणार आहे. यासाठीच ‘अॅनिमल’चे निर्माते चित्रपट हीट व्हावा यासाठी शक्य असेल तितकी मेहनत घेत आहे.

आणखी वाचा : Sam Bahadur Trailer: “हमारी वर्दी का गौरव हमेशा…” विकी कौशलच्या बहुचर्चित ‘सॅम बहादुर’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

मीडिया रीपोर्टनुसार निर्माते या चित्रपटाला अमेरिकेत ‘ब्रह्मास्त्र’पेक्षा जास्त स्क्रीन्स मिळवण्यासाठी धडपड करत आहेत. अमेरिकेत हा चित्रपट ३० नोव्हेंबरलाच प्रदर्शित होणार आहे. अन् याचसाठी ‘अ‍ॅनिमल’चे निर्माते धडपडत करत आहेत. ‘ब्रह्मास्त्र’च्या वेळी जेवढे शोज अमेरिकेत मिळाले होते त्याहून अधिक शोज ‘अ‍ॅनिमल’ला मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

अमेरिकेत ‘ब्रह्मास्त्र’ ८१० स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला होता, तर ‘अॅनिमल’साठी निर्माते याहून अधिक म्हणजे ८८८ स्क्रीन्सवर प्रदर्शित करण्याचा विचार करत आहेत. याचसाठी त्यांची धडपड सुरू आहे. आता यामुळे ‘अ‍ॅनिमल’ला किती फायदा होत आहे. ‘अ‍ॅनिमल’चा ट्रेलर १० ते १२ नोव्हेंबर दरम्यान प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी ही तारीख २३ नोव्हेंबरसुद्धा सांगितली जात आहे. सणासुदीचे दिवस असल्याने या ट्रेलरच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या एका रीपोर्टनुसार ‘अ‍ॅनिमल’चा ट्रेलर १८ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार असल्याची शक्यता आहे.

आणखी वाचा : ‘आश्रम’मधील ‘बबिता’ अडकणार लग्नबंधनात; त्रिधा चौधरीचा मोठा खुलासा, म्हणाली “पुढील वर्षी…”

‘अ‍ॅनिमल’ची कथा व दिग्दर्शन ‘अर्जुन रेड्डी’ व ‘कबीर सिंग’सारखे चित्रपट देणारे संदीप रेड्डी वांगा यांनी केलं आहे. हा आजवरच्या चित्रपट इतिहासातील अत्यंत हिंस्र चित्रपट असल्याचं संदीप यांनीही एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं होतं. या चित्रपटात रणबीर कपूरसह रश्मिका मंदाना, बॉबी देओल, अनिल कपूर, सुरेश ओबेरॉय हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘अ‍ॅनिमल’ १ डिसेंबर २०२३ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Producer of animal trying to release films on more screens in america avn
Show comments