सनी देओल अडचणीत सापडला आहे. चित्रपट निर्माता सौरव गुप्ताने सनीवर गंभीर आरोप केले आहेत. त्याने सनी देओलवर फसवणूक व खंडणीचे आरोप केले आहेत. २०१६ मध्ये सनी देओलने चित्रपट करण्याच्या नावाखाली त्याच्याकडून अॅडव्हान्स पैसे घेतले होते आणि त्यानंतरही तो चित्रपट लवकरच करू असं म्हणत पैसे घेत होता, पण त्याने आपल्याबरोबर कोणताही चित्रपट केला नाही, असं काही दिवसांपूर्वी सौरव गुप्ताने पत्रकार परिषदेत सांगितलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सौरव गुप्ताचे आरोप नेमके काय?

सौरव गुप्ताने ‘हिंदुस्तान टाइम्स’ ला सांगितलं की सनी देओलने त्याच्याशी २०१६ मध्ये एक डील केली. त्यानुसार ते एकत्र चित्रपट करणार होते आणि सनीचं मानधन चार कोटी रुपये ठरवण्यात आलं होतं. “आम्ही त्याला १ कोटी रुपये ॲडव्हान्स दिले, पण चित्रपट सुरू करण्याऐवजी त्याने २०१७ मध्ये पोस्टर बॉयचं शूटिंग सुरू केलं. तो वारंवार पैसे मागत राहिला. आतापर्यंत आम्ही सनीच्या खात्यात २.५५ कोटी रुपये ट्रान्सफर केले आहेत. त्याने मला दुसऱ्या दिग्दर्शकालाही पैसे देण्यास सांगितलं. तसेच मला फिल्मिस्तान स्टुडिओ बुक करून एक कार्यकारी निर्माता घेण्यासही सांगितलं,” असं सौरव गुप्ताने म्हटलं आहे.

आई-वडील झोपल्यावर मध्यरात्री त्यांच्या खोलीत जायची जान्हवी कपूर, कारण सांगत म्हणाली…

सनी देओलने करारात केला बदल?

२०२३ मध्ये सनी देओलने आपल्या कंपनीबरोबर बनावट करार केल्याचा आरोपही गुप्ताने केला आहे. “जेव्हा आम्ही करार वाचला तेव्हा लक्षात आलं की त्याने मधलं पानच बदललं. त्याठिकाणी मानधन चार कोटींवरून आठ कोटी करण्यात आलं तर नफ्याची रक्कम वाढवून दोन कोटी रुपये करण्यात आली,” असं सौरव गुप्ता म्हणाला.

हिरवी पैठणी, नाकात नथ अन् चंद्रकोर, Cannes च्या रेड कार्पेटवर मराठी लूकमध्ये अवतरलेली ‘ती’ कोण? जगभरात होतेय चर्चा

दुसऱ्या निर्मात्यानेही केले आरोप

केवळ सौरव गुप्ताच नाही तर चित्रपट निर्माते सुनील दर्शन यांनीही सनी देओलवर अशाच प्रकारचे आरोप केले आहेत. “सनी देओलने माझ्या अजय (१९९६) चित्रपटाचे हक्क परदेशात वितरणासाठी घेतले होते आणि फक्त अर्धे पैसे दिले होते. त्याने उरलेले पैसे कधीच दिले नाहीत,” असा आरोप त्यांनीही या पत्रकार परिषदेत केला.

पहिलं लग्न मोडल्यावर वयाने लहान कृष्णाच्या प्रेमात पडली होती कश्मीरा शाह, अभिनेत्री ५२ वर्षांची, तर पती फक्त…

सनीने आजवर अनेक चित्रपट निर्मात्यांना त्यांच्याबरोबर काम करण्याचं वचन देऊन नंतर नकार दिल्याचं म्हटलं जात आहे. अनेक निर्मात्यांनी एकत्र येऊन एक अॅग्रीमेंट केलंय, त्यात सनीबद्दल लिहिलं आहे. तो कूप वर्षांपासून असंच करतोय, त्याच्यामुळे आजवर अनेक चित्रपट निर्मात्यांचे पैसे वाया गेल्याचं त्यात म्हटलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Producer sourav gupta accused sunny deol for cheating and taking money hrc