अयान मुखर्जीचा ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. हा चित्रपट ९ सप्टेंबरला प्रदर्शित झाला होता. यात रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय प्रमुख भूमिकेत आहेत. तर शाहरुख खान पाहुणया कलाकाराच्या भूमिकेत दिसला. याशिवाय रणबीर अर्थात शिवाचे आई-वडील म्हणून अमृता आणि देव यांची हलकीशी झलक दिसून आली. तेव्हापासून ‘ब्रह्मास्त्र २’मध्ये देवची भूमिका कोण साकारणार यावर बरीच चर्चा रंगताना दिसत आहे.
आणखी वाचा : Bigg Boss 16: ‘बिग बॉस’च्या घरात येणार नवा ट्विस्ट, होणार कतरिना कैफची एंट्री आणि…
‘ब्रह्मास्त्र : पार्ट २- देव’ या चित्रपटात रणवीर सिंग देवच्या भूमिकेत तर दीपिका पदुकोण अमृताची भूमिका साकारणार असल्याची काही दिवसांपूर्वी चर्चा होती. रणवीर व्यतिरिक्त हृतिक रोशनचेही नाव देवच्या भूमिकेसाठी पुढे येत होते, पण आता यात एक नवा ट्विस्ट आला आहे. शाहरुख, रणवीर आणि हृतिकला मागे टाकत एका दक्षिणात्य अभिनेत्याला या भूमिकेसाठी विचारणा झाल्याचे समोर आलं आहे.
दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक म्हणजे यश. ‘केजीएफ’ चित्रपटात त्याने साकारलेल्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले. या चित्रपटामुळे जगभरात तो स्टार झाला. आता त्याची वर्णी ब्रह्मास्त्र चित्रपटात लागण्याची शक्यता आहे. ‘ब्रह्मास्त्र’च्या निर्मात्यांनी यशला ‘ब्रह्मास्त्र 2’मध्ये ‘देव’ या भूमिकेसाठी विचारणा केली असल्याचे समोर आले आहे. परंतु अद्याप यशने या भूमिकेला होकार दिलेला नाही. यशला ‘ब्रह्मास्त्र २’ बरोबरच आणखीन एका बिग बजेट बॉलिवूड चित्रपटाचीही विचारणा झाली असल्याने तो या दोन्हीपैकी कोणत्यातरी एकाच चित्रपटाला होकार देईल असे समजते. जानेवारी २०२३ पर्यंत यश त्याचा निर्णय जाहीर करेल असेही समोर आले आहे. पण यश होकार देत नाही तोवर ब्रह्मास्त्रची टीम ‘देव’च्या भूमिकेसाठी अजूनही कलाकारांचा विचार करणार असल्याचे कळते.
हेही वाचा : Video : “आता खूप झालं…” अयान मुखर्जीवर वैतागला रणबीर कपूर, व्हिडीओ व्हायरल
आता ‘ब्रह्मास्त्र’मध्ये देवाची भूमिका कोण साकारणार? काय आहे रणबीर कपूरचे वडील देव यांची कहाणी? देवसाठी ‘ब्रह्मास्त्र’ का आवश्यक आहे? देव आणि अमृता का वेगळे झाले? दीपिका पदुकोण अमृताची भूमिका साकारणार की आणखी कोणी? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ‘ब्रह्मास्त्र २’ मध्येच पाहायला मिळणार आहेत. अयान मुखर्जीने एका मुलाखतीत सांगितले होते की, चित्रपटाचा दुसरा भाग डिसेंबर २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे.