‘पठाण’ला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर शाहरुख खानचे चाहते त्याच्या आगामी चित्रपटांची आतुरतेने वाट बघत आहेत. त्याच्या येणाऱ्या चित्रपटांच्या यादीत ‘डंकी’ आणि ‘जवान’ हे चित्रपट आहेत. यापैकी शाहरुखचा ‘जवान’ चित्रपट ‘डंकी’च्या आधी प्रदर्शित होणार असल्याने या चित्रपटासाठी त्याचे चाहते प्रचंड उत्सुक आहेत. परंतु आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शाहरुखने ‘जवान’ची घोषणा करताच सर्वांचे लक्ष या चित्रपटाकडे लागले. यातील त्याच्या फर्स्ट लूकचीही प्रेक्षकांनी प्रशंसा केली. गेले अनेक दिवस शाहरुख खान त्याच्या ‘जवान’ या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र होता. हा चित्रपट २ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची अधिकृत घोषणाही करण्यात आली होती. मात्र आता निर्मात्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे.

आणखी वाचा : Video: ‘पठाण’पेक्षाही जबरदस्त व्हीएफएक्स अन्…; प्रदर्शनाच्या काही तास आधीच ‘जवान’ चित्रपटाच्या टीझरमधील क्लिप लिक

या चित्रपटाचा एक धमाकेदार टीझर प्रदर्शित करून या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा गेल्या वर्षी करण्यात आली होती. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाला एक महिनाच बाकी होता. परंतु अजूनही या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला नाही, याचबरोबर या चित्रपटाच्या प्रमोशनला देखील सुरुवात करण्यात आली नाही. हे न करण्यामागचे मुख्य कारण म्हणजे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निर्मात्यांनी बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटाच्या व्हीएफएक्सचं काम अजून शिल्लक आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी या चित्रपटाच्या टीमला आणखी कालावधी हवा आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आता हा चित्रपट जूनऐवजी ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित होईल असे बोलले जात आहे. त्यामुळे शाहरुख खानला या चित्रपटात पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांना आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

हेही वाचा : शाहरुख खानच्या ‘जवान’ने रचला नवा विक्रम, प्रदर्शनाआधीच चित्रपटाने कमावले ‘इतके’ कोटी

या चित्रपटात शाहरुख खानबरोबर दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारासह अभिनेता विजय सेतुपतीदेखील दिसणार आहे. तर या चित्रपटात दीपिका पदुकोण कॅमिओ करताना दिसणार असल्याचेही बोलले जात आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Producers of shahrukh khan starrer jawan postponed release date of the film rnv