बॉलीवूड कपल पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा यांचा विवाहसोहळा १५ मार्चला थाटामाटात पार पडला. पुलकित-क्रितीने मानेसरमध्ये लग्नगाठ बांधली. पुलकित-क्रितीच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. १५ एप्रिलला पुलकित-क्रितीच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला. या निमित्ताने दोघांनी आपल्या सोशल मीडियावर लग्नसोहळ्यातील काही क्षण शेअर केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवरीची मंडपात एंट्री होताच पुलकितचे अश्रू अनावर झाले. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय. क्रिती आणि पुलकितने या खास दिवशी एकमेकांसाठी छोटसं स्पीच तयार केलं होतं. यात त्यांनी एकमेकांबद्दल खूप सुंदर गोष्टी लिहिल्या होत्या. आपल्या भावना व्यक्त करत असताना दोघांचेही डोळे पाणावले होते.

हेही वाचा… “मी तुमच्यासमोर हात जोडते…”, सलमान खानच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर राखी सावंतची बिष्णोई गँगला विनंती, म्हणाली…

सप्तपदीच्या आधी पुलकित क्रितीला भेटायला आला होता. तेव्हा “ब्राईड ओ ब्राईड” अशी हाक मारत त्याने क्रितीला बोलावलं. पुलकितच्या हाकेनंतर क्रिती बाहेर आली आणि तिने त्याला घट्ट मिठी मारली.

क्रितीने याचा व्हिडीओ तिच्या अधिकृत सोशल मीडियावर शेअर केला आहे. “जेव्हा आम्ही एकमेकांना शोधलं, तेव्हा खरंतर आम्ही स्वतःला शोधलं आणि हे सर्वात सुंदर प्रकारचं प्रेम आहे. आता तर लग्नाला एक महिना झाला आहे, पण कायम आयुष्य एकत्र जगण्याची सुरुवात खूप आधीपासूनच सुरू झाली आहे.”

हेही वाचा… सलमान खानच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर अरबाज खानची पहिली पोस्ट; अभिनेता म्हणाला, “दुर्दैवाने काही लोक…”

क्रितीने लग्नाचे फोटो आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केले होते. लग्नासाठी क्रितीने बेबी पिंक रंगाचा लेहेंगा निवडला होता, तर पुलकितने या खास दिवसासाठी ऑलिव्ह ग्रीन रंगाची शेरवानी परिधान केली होती. पुलकितच्या शेरवानीची खासियत म्हणजे यावर संस्कृतमध्ये मंत्र लिहिलेले होते. सुंदर कॅप्शन देत क्रितीने हे लग्नाचे फोटो शेअर केले होते. क्रितीने लग्नाचे फोटो शेअर केल्यानंतर बॉलीवूड कलाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव झाला होता.

हेही वाचा… धोनीचा षटकार पाहून नेहा धुपिया झाली अवाक, तर करीना कपूरने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया, व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, पुलकित व क्रितीबद्दल सांगायचं झाल्यास मागच्या काही वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत होते. दोघांनी काही महिन्यांपूर्वी मार्चमध्ये लग्न करणार असल्याचे संकेत फोटो पोस्ट करून दिले होते. दोघांनी १५ मार्च रोजी मानेसरमध्ये कुटुंबीय व जवळच्या लोकांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pulkit samrat kriti kharbanda gets emotional in wedding rituals video viral dvr