‘द केरला स्टोरी’ चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जोरदार कमाई केली आहे. केवळ १२ दिवसांमध्येच या चित्रपटाने १५० कोटींची कमाई केली होती. एकीकडे या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे तर दुसरीकडे या चित्रपटाच्या पटकथेवरुन अनेक वाद निर्माण झाले आहे. काही राज्यांमध्ये या चित्रपटावर बंदीही घालण्यात आली आहे. पुण्यातील FTII मध्ये ‘द केरला स्टोरी’ दाखवण्यावरुन वाद निर्माण झाला आहे.

‘द केरला स्टोरी’ या चित्रपटावरून पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) विद्यार्थ्यांमध्ये वाद निर्माण झाला आहे. एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांचा एक गट चित्रपटाच्या समर्थनार्थ पुढे आला आहे तर दुसरा गट चित्रपटाच्या विरोधात आहे. शनिवारी (२० मे रोजी) एका गटाने चित्रपटाच्या स्क्रीनिंग थांबवण्याचाही प्रयत्न केला. प्रदर्शनापूर्वी काही विद्यार्थी हातात बॅनर घेऊन चित्रपटाच्या विरोधात घोषणा देत होते. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पुण्यातील एफटीआयआयमध्ये ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाचे स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. या स्क्रिनिंगसाठी चित्रपटाची स्टारकास्टही उपस्थित राहणार होती. मात्र, हा चित्रपट दाखवू नये अशी एफटीआयआयमधील काही विद्यार्थ्यांनी मागणी केली. तर विद्यार्थ्यांचा दुसरा गट चित्रपट दाखवण्यावर ठाम होते. यावरुन चित्रपट समर्थक आणि विरोधी विद्यार्थ्यांमध्ये वाद निर्माण झाला. मात्र, या तणावाच्या परिस्थितीतही सकाळी ९ वाजता चित्रपट दाखवण्यात आला. आतल्या बाजूस चित्रपट सुरु असताना विरोधी विद्यार्थांच्या गटाने बाहेर घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली होती.

हेही वाचा- ‘द केरला स्टोरी’मधील रेप सीनबाबत आपल्या आजीच्या प्रतिक्रियेने घाबरली होती अदा शर्मा; म्हणाली…

गेल्या काही दिवसांपासून अनेक कारणाने एफटीआयआयचे विद्यार्थी सातत्याने आंदोलन करत आहेत. २०२० साली पाच विद्यार्थ्यांना अपेक्षित हजेरी न लावल्यामुळे आणि अपेक्षित गुण न मिळाल्यामुळे महाविद्यालयातून काढून टाकण्यात आले होते. याच्या निषेधार्थ एफटीआयआय विद्यार्थी संघटनेने गेल्या पाच दिवसांपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते. आजचा उपोषणाचा पाचवा आणि आंदोलनाचा चाळीसावा दिवस होता. पण आता ‘द केरला’ स्टोरीचं प्रदर्शन थांबवण्यासाठी नवीन आंदोलन सुरू झाल्याचं पहायला मिळालं आहे.

Story img Loader