आपल्या संगीताने आणि गायकिने जगभरातील संगीतप्रेमींना भुरळ घालणारे संगीतकार-गायक ए आर रेहमान यांच्या विविध भाषांमधील गाण्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केलं. भारतीय संगीत आणि पाश्चात्त्य संगीत यांचा मिलाप त्यांच्या गाण्यांमधून पाहायला मिळतो. त्यांनी ऑस्कर पुरस्कारवरही स्वतःचे नाव कोरले आहे. जगभरातील आघाडीच्या संगीतकारांमध्ये त्यांचं नाव सामील आहे.

नुकताच ए आर रेहमान यांचा पुण्यात एक लाईव्ह कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम सुरू असताना पुणे पोलिसांनी मध्येच येऊन हा कार्यक्रम थांबवल्याने बऱ्याच लोकांची निराशा झाली. पुण्याच्या राजा बहादूर मिलच्या आवारात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. भर कार्यक्रमात मंचावर येऊन पोलिसांनी हा कार्यक्रम बंद करायला लावल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Action against harassment of women Police will patrol during Navratri festival
पिंपरी : दांडियात महिलांची छेडछाड काढल्यास ‘दंडुका’; नवरात्रोत्सवाच्या काळात पोलीस पायी गस्त घालणार
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
SIMI, 2008 Malegaon blasts,
२००८ सालच्या मालेगाव बॉम्बस्फोटामागे सिमीचा हात, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा विशेष न्यायालयात दावा
Kidnap of priest, ransom, Karnataka, loksatta news,
पाच कोटींच्या खंडणीसाठी पुजाऱ्यासह शिष्यांचे अपहरण, कर्नाटकातून तिघे अटकेत
Imtiaz Jaleel, case against Imtiaz Jaleel, Pune,
माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल
Accused absconding for 20 years ,
२० वर्षे फरार आरोपी अटकेत
Ubt leader Kishori pednekar meet rape victim in nagpur
नागपूर हादरले… आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार; नराधमास अटक
Mumbai crime news, Youth Murder Ghatkopar,
मुंबई : घाटकोपरमध्ये तरुणाची हत्या

आणखी वाचा : “हा संघ परिवाराचा अजेंडा…” केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचं ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाबद्दल मोठं वक्तव्य

रविवारी सायंकाळी ८ वाजता सुरू झालेला हा कार्यक्रम रात्री १० पर्यंत संपायला पाहिजे होता. तसे न झाल्याने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी स्टेजवर जाऊन हा कार्यक्रम बंद केला. रेहमान त्याचं ‘छैंया छैंया’ हे गाणं सादर करत असताना पोलिस अधिकाऱ्यांनी मंचावर येऊन रेहमानला घड्याळात किती वाजलेत याची आठवण करून दिली. तरीदेखील कार्यक्रम सुरूच होता.

यानंतर मात्र पोलिस अधिकारी मंचावरीलच एका बॅन्ड सदस्याकडे गेले आणि कार्यक्रम बंद करा नहीतर कारवाई करावी लागेल असे त्यांनी सांगितल्यावर कार्यक्रम बंद करण्यात आला. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करताच रेहमान यांनी उपस्थित असलेल्या पुणेकरांचे आभार मानले आणि कार्यक्रम बंद करून मंचावरून खाली उतरले. रेहमानच्या गाण्यावर थिरकणारे प्रेक्षक मात्र पोलिसांच्या या कारवाईमुळे चांगलेच निराश झाले होते.