पंजाबी गायक रिआर साबला काही महिन्यांपूर्वी कोणीही ओळखत नव्हते, परंतु त्याच्या ‘ओब्सेस्ड’ (obsessed) गाण्याने त्याला रातोरात स्टार बनवले. रिआरच्या ‘ओब्सेस्ड’ गाण्यावर आता सोशल मीडियावर लाखो व्हिडीओ बनवण्यात आले आहेत. इन्स्टाग्रामसह सोशल मीडियावर आपल्या गाण्याला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून रियार साब खूप आनंदी आहे. याचे संपूर्ण श्रेय रिआरने एका खास व्यक्तीला दिले आहे.
हेही वाचा : “जब प्यार किया तो डरना क्या” न्यूयॉर्कमध्ये टाइम्स स्क्वेअर परिसरात दुमदुमला मराठमोळ्या गायिकेचा आवाज
गाण्याला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल रियार साबने बॉलीवूड अभिनेता विकी कौशलचे आभार मानले आहेत. एका मुलाखतीदरम्यान रिआर म्हणाला, “या गाण्याला दिलेल्या भरभरून प्रतिसादासाठी मी माझ्या सगळ्या चाहत्यांचे आभार मानतो. सोशल मीडियामुळे संपूर्ण म्युझिक इंडस्ट्रीमध्ये बदल झाला आहे. अलीकडच्या काळात तुमचे गाणे सोशल मीडियावर व्हायरल होणे गरजेचे आहे, अशी व्हायरल झालेली गाणी तुमची एक नवी ओळख बनवतात.”
हेही वाचा : मीरा राजपूतच्या ‘या’ सवयीचा शाहिद कपूरला आलाय कंटाळा; म्हणाला, “एवढी वर्ष झाली, पण…”
रिआर पुढे म्हणाला, “माझ्या गाण्यावर डान्स केल्याबद्दल मी विकी कौशल पाजींचे मनापासून आभार मानतो कारण, त्यांनी माझ्या गाण्यावर डान्स केल्यामुळे आज माझे संपूर्ण आयुष्य बदलले आहे. पाजींच्या ‘ओब्सेस्ड’वरील व्हिडीओमुळे माझ्या इतर गाण्यांबद्दलही लोकांना कळाले. भविष्यात त्यांच्याबरोबर काम करण्याची माझी इच्छा आहे.”
हेही वाचा : लैंगिक समानतेविषयी बोलणं आलिया भट्टला पडलं महागात; नेटकरी ट्रोल करत म्हणाले, “तुझ्या बोलण्याला…”
विकी कौशलने रिआर साबच्या ‘ओब्सेस्ड’ गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केला होता. विकीने शेअर केलेल्या व्हिडीओला आता ५१ मिलियनहून अधिक व्ह्यूज आले आहेत. व्हिडीओ शेअर करताना विकीने रिआर साबला टॅग केले होते. या व्हिडीओमुळेच ‘ओब्सेस्ड’ गाण्याची लोकप्रियता प्रचंड वाढल्याचे रिआरने सांगितले.