‘पुष्पा’ चित्रपटामुळे लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री म्हणजे रश्मिका मंदाना, दाक्षिणात्य चित्रपटातील आघाडीची अभिनेत्री म्हणून तिच्याकडे पहिले जाते. नॅशनल क्रश बनलेली रश्मिका नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. ‘पुष्पा’ चित्रपटामुळे ती सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. या चित्रपटात तिची अल्लूबरोबरची जोडी प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे. रश्मिकाचा ‘गुडबाय’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात तिने पहिल्यांदा अमिताभ बच्चन याच्याबरोबर काम केले आहे.

चित्रपटाच्या निमित्ताने ती प्रमोशनसाठी फिरत होती त्यादरम्यान बॉलिवुड लाईफला दिलेल्या मुलाखतीत तिने बॉलिवूडमधील अभिनेत्रींबाबत प्रतिक्रिया दिली आहे. तिला प्रश्न विचारला की ‘बॉलिवूडच्या अभिनेत्रींकडून गोष्टी चोरशील’? त्यावर मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीने अभिनेत्रींचे नाव घेतले. आलियाचे नाव घेतल्यावर रश्मिका म्हणाली ‘मला खरेपणा चोरयाला आवडेल’ कारण ती खूप खरी आहे. दीपिकाची चोरशील विचारल्यावर ती म्हणाली, ‘तिचे हास्य, मला तिचे हास्य खूप आवडते’. कतरीना विचारले असता ती म्हणाली’ मेहनतीचा गुण घेईन, कारण ती अथक परिश्रम घेत असते’.

सिद्धार्थने ‘या’ अभिनेत्रीला किस करायची व्यक्त केली होती इच्छा; म्हणाला “आलियाला किस करताना…”

रश्मिकाचे नाव विजय देवरकोंडांबरोबर जोडले जात आहे. ते दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहे. दोघांनी ‘डियर कॉम्रेड’ आणि ‘गीता गोविंदम’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. सध्या ती ‘पुष्पा २’ च्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. तिचे चाहते चित्रपटाची आहेत.

रश्मिकाने २०१६ मध्ये ‘किरिक पार्टी’ (Kirik Party) या कन्नड चित्रपटाच्या माध्यमातून कारकीर्दीची सुरुवात केली होती. ल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा’ या चित्रपटामुळे तिची लोकप्रियता वाढली. तिने साकारलेल्या श्रीवल्ली या भूमिकेला प्रेक्षकांचे प्रेम मिळाले. ‘पुष्पा २’ देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या भागात पुन्हा एकदा अल्लू रश्मिका ही जोडी पुन्हा एकदा दिसणार आहे.

Story img Loader