Pushpa 2 Allu Arjun And Rashmika Dance Video : अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘पुष्पा २’ सिनेमा आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा पहिला भाग २०२१ मध्ये प्रदर्शित झाला होता. तब्बल ३ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रेक्षकांना, आता पुन्हा एकदा सिनेमागृहांमध्ये ‘पुष्पाराज’ अनुभवता येणार आहे. यासाठी अ‍ॅडव्हान्स बुकिंगला आजपासून ( ३० नोव्हेंबर ) सुरुवात होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘पुष्पा’च्या पहिल्या भागाने बॉक्स ऑफिस कलेक्शनचे सर्व रेकॉर्ड्स मोडले होते. त्यामुळे आता या दुसऱ्या भागाकडून सुद्धा प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा आहेत. ‘Pushpa 2’ चित्रपटाची सध्या सर्वत्र क्रेझ निर्माण झाली आहे. या चित्रपटामधलं “अंगारों का अंबर सा लगता है मेरा सामी” हे गाणं मे महिन्याच्या अखेरीस प्रदर्शित करण्यात आलं होतं. तेव्हापासून हे गाणं सोशल मीडियावर तुफान ट्रेंड होत आहे.

हेही वाचा : Video : रेश्मा शिंदेने घेतला हिंदी उखाणा! ‘रंग माझा वेगळा’च्या टीमने लग्नात केली धमाल, नवरा-नवरीच्या दाक्षिणात्य लूकने वेधलं लक्ष

अल्लू अर्जुन अन् रश्मिका मंदानाचा ‘सुसेकी’ गाण्यावर डान्स

‘Pushpa 2’मधील ‘सुसेकी’ गाणं प्रदर्शित झाल्यावर या गाण्याने सोशल मीडियावर सर्वत्र धुमाकूळ घातला होता. सामान्य लोकांपासून ते बॉलीवूड कलाकारांपर्यंत सगळ्यांना या गाण्याची भुरळ पडली होती. नेटकरी ट्रेंडनुसार रश्मिका अन् अल्लू अर्जुनसारख्या हुबेहूब हुकस्टेप करून लक्ष वेधून घेऊ लागले होते. आता खुद्द ऑनस्क्रीन ‘पुष्पा’ आणि ‘श्रीवल्ली’ या गाण्यावर थिरकले आहेत.

‘पुष्पा २’च्या प्रमोशन इव्हेंटला अल्लू अर्जुन आणि रश्मिका यांनी ‘सुसेकी’ जबरदस्त डान्स केल्याचं पाहायला मिळालं. या दोघांच्या डान्सचे व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहेत. पुष्पा आणि श्रीवल्लीने काळ्या रंगाचे कपडे घालत या इव्हेंटला Twinning केलं होतं.

हेही वाचा : “माझी होम मिनिस्टर…”, म्हणत ‘देवमाणूस’ फेम अभिनेत्याने दिली प्रेमाची जाहीर कबुली; मराठी कलाकारांकडून कमेंट्सचा वर्षाव

हेही वाचा : नाना पाटेकरांनी अंकशास्त्रावर विश्वास असलेल्या स्पर्धकाला विचारले असे प्रश्न, तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला; पाहा Video

नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर “पुष्पा आणि श्रीवल्ली फायर है”, “मस्त जोडी”, “हा चित्रपट ब्लॉकबस्टर होणार”, “फ्लॉवर समजे क्या…”, “या दोघांची केमिस्ट्री कमाल आहे” अशा कमेंट्स केल्या आहेत. दरम्यान, सुरुवातीला ‘Pushpa 2’ २०२४ च्या ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित होणार होता. पण, तांत्रिक बाबींमुळे या सिनेमाचं प्रदर्शन मेकर्सकडून पुढे ढकलण्यात आलं. अल्लू अर्जुनने नुकतीच इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झाल्याचं सांगितलं आहे. आता येत्या ५ डिसेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pushpa 2 allu arjun and rashmika mandanna dance performance on sooseki song at event video viral sva 00