Pushpa 2 : पुष्पा द रुल अर्थात पुष्पा २ हा सिनेमा ५ डिसेंबरला प्रदर्शित झाला. हा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासूनच धुमाकूळ घालतो आहे. या सिनेमाची जागतिक स्तरावरची कमाई १ हजार कोटींच्या पुढे गेली आहे. ५ डिसेंबर ते ११ डिसेंबर इतक्या कमी कालावधीत एक हजार कोटी क्लबमध्ये गेलेला हा पहिलाच सिनेमा ठरला आहे.
पुष्पा द रुल हा सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पुष्पा द रुल ( Pushpa 2 🙂 या सिनेमात अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना, फहाद फासिल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सिनेमा प्रदर्शित झाल्यापासूनच बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करतो आहे. पहिल्याच दिवशी पुष्पा 2 ( Pushpa 2 ) या सिनेमाने २९४ कोटींची कमाई केली होती. प्रदर्शित झाल्यानंतर हा सिनेमा अवघ्या सहा दिवसांमध्ये १ हजार कोटींच्या क्लबमध्ये पोहचला आहे. मात्र हा सिनेमा एकच असा सिनेमा नाही जो एक हजार कोटींच्या क्लबमध्ये पोहचला आहे. याआधीचे असे खास चित्रपट आहेत ज्यांनी बॉक्स ऑफिसवर १ हजार कोटींहून अधिक कमाई केली आहे.
दंगल सिनेमाचं कलेक्शन सर्वाधिक
एक हजार कोटींच्या क्लबमध्ये गेलेला एक महत्त्वाचा सिनेमा म्हणजे आमीर खानचा दंगल हा सिनेमा. या चित्रपटाने वर्ल्डवाईड १ हजार ९७० कोटींची कमाई केली आहे. हा सिनेमा महावीर फोगट आणि त्यांच्या मुलींवर म्हणजेच गीता आणि बबिता फोगट यांच्या आयुष्यावर बेतला आहे.
बाहुबली २ या सिनेमानेही उत्तम कमाई केली
यानंतर नाव घ्यावं लागेल ते बाहुबली २ द कनक्लुजन या सिनेमाचं. प्रभास, अनुष्का शेट्टी आणि राणा डग्गुबाती यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. बाहुबली द कनक्लुजन या सिनेमाने १ हजार ८१४ कोटींचा व्यवसाय केला होता. यानंतर येतो तो आरआरआर हा सिनेमा या सिनेमात आलिया भट्टही होती. या सिनेमाने १२३० कोटींची कमाई केली होती.
हजार कोटींच्या क्लबमध्ये शाहरुखचे दोन चित्रपट
KGF चॅप्टर 2 या सिनेमानेही १२०८ रुपये कमवले होते. तर कल्की या सिनेमाने १ हजार ६० कोटी रुपये कमावले होते. तर शाहरुख खानच्या जवान या सिनेमाने ११६० कोटींची कमाई केली होती. तर शाहरुखच्या पठाण या सिनेमाने १०५५ कोटींची कमाई केली होती. त्यानंतर आता पुष्पा २ ( Pushpa 2 ) हा सिनेमा एक हजार कोटींच्या क्लबमध्ये गेला आहे. या सिनेमाने ( Pushpa 2 ) एक हजार कोटींहून अधिक पैसे कमावले आहेत. या सिनेमाची जादू प्रेक्षकांवर अद्यापही कायम आहे.