दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन मुख्य भूमिकेत असलेल्या ‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली होती. २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची कथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. काही दिवसांपूर्वीच ‘पुष्पा २’चा टीझर प्रदर्शित झाला. त्यातून या चित्रपटातील अल्लू अर्जुनचा लूक समोर आला होता. या चित्रपटासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. आता या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जन प्रदर्शनाच्या आधीच प्रचंड मोठी रक्कम कमवली आहे.

‘पुष्पा २’च्या टीझरमध्ये ‘पुष्पा’ तिरुपती तुरुंगातून फरार असल्याचं दाखवण्यात आलं आहे. तर यामुळे शहरात दंगलीसदृश परिस्थिती निर्माण झाली असून सर्वांना एकाच प्रश्न पडला आहे की “पुष्पा कुठे आहे?” एकीकडे पोलीस पुष्पाला शोधताना दिसत आहेत, तर दुसरीकडे लोक पुष्पाने त्यांना मदत केल्याबद्दल त्याचं कौतुक करताना दिसत आहेत. या उत्कंठावर्धक टीझरला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. आता या टीझरनंतर या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनचे ओटीटी राईट्स मोठ्या किंमतीला विकले गेले आहेत.

Junaid khan says he releasing film on youtube is best
थिएटर व OTT च्या वादावर आमिर खानचा मुलगा म्हणाला, “चित्रपट युट्यूबवर मोफत…”
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Naga Chaitanya
‘थांडेल’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात नागा चैतन्यला आली पत्नी सोभिताची आठवण; म्हणाला…
marathi actor shares his opinion on chhaava movie
“लहान तोंडी मोठा घास, पण…”, ‘छावा’चा ट्रेलर पाहून मराठी अभिनेत्याने व्यक्त केली ‘ती’ खंत; विकी कौशलबद्दल म्हणाला…
vaastav 2 sanjay dutt mahesh manjrekar
महेश मांजरेकरांच्या ‘वास्तव’चा २६ वर्षांनी येणार सिक्वेल? संजय दत्त सिनेमात दिसणार की नाही? वाचा…
Chhaava Trailer Outrage Uday Samant
Chhaava Movie Trailer: “..तर चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही”, ‘छावा’बाबत सरकारची स्पष्ट भूमिका; उदय सामंत म्हणाले…
chhaava trailer vicky kaushal in lead role
आग लावणारा ट्रेलर, विकीला यंदा सगळे अवॉर्ड्स…; ‘छावा’च्या ट्रेलरवर कमेंट्सचा पाऊस, मराठी कलाकार काय म्हणाले?
south suspense thriller movies
थरारक सीन्सच्या जोडीला आहेत चकित करणारे क्लायमॅक्स, मोफत पाहता येतील ‘हे’ चित्रपट

आणखी वाचा : काय सांगता! ‘पुष्पा २’साठी अल्लू अर्जुनने आकारले ‘इतके’ कोटी, मानधनाचा आकडा वाचून व्हाल आवाक्

मीडिया रिपोर्सनुसार, ‘पुष्पा २’च्या हिंदी व्हर्जनचे राईट्स २०० कोटींना विकले गेले. आहेत. तर या चित्रपटाचे ऑडिओ राईट्सही ७५ कोटींना विकले गेले आहेत. म्हणजेच प्रदर्शनाच्या आधीच ‘पुष्पा: द रुल’ने एकूण २७५ कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर २००० कोटींचा गल्ला जमवेल, अशी या चित्रपटाच्या निर्मात्यांना आशा आहे.

हेही वाचा : Pushpa 2 Teaser: दंगली, जाळपोळ, पुष्पाचा शोध अन्…; ‘पुष्पा २’चा उत्कंठावर्धक टीझर प्रदर्शित

‘पुष्पा २’ चित्रपटातून अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांची ऑन स्क्रीन केमिस्ट्री पुन्हा एकदा पाहता येणार आहे. हा चित्रपट २०२३ च्या शेवटी किंवा २०१४ च्या सुरुवातीला प्रदर्शित होईल असं बोललं जात आहे.

Story img Loader