Pushpa 2 : पुष्पा 2 ( Pushpa 2 ) हा अल्लू अर्जुन रश्मिका मंदानाचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे. याच सिनेमातलं महत्त्वाचं पात्र आहे ते म्हणजे भैरव सिंग शेखावत. सिनेमात खलनायकी पात्र साकारणाऱ्या या पात्राच्या आडनावावरुन आता करणी सेना आक्रमक झाली आहे. निर्मात्यांनी सिनेमात असलेलं शेखावत हे आडनाव बदलावं अन्यथा मार खाण्याची तयारी ठेवावी अशी मागणी करणी सेनेने केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हटलं आहे करणी सेनेने?

“शेखावत या शब्दाचा दुरुपयोग चित्रपटात करण्यात आला आहे. पुष्पा 2 ( Pushpa 2 ) या सिनेमात शेखावत आडनाव असलेल्या व्यक्तीला खलनायक दाखवण्यात आलं आहे. हा क्षत्रियांचा अपमान आहे. हे नाव लवकरात लवकर हटवण्यात आलं पाहिजे अन्यथा पुष्पा 2 ( Pushpa 2 ) च्या निर्मात्यांनी मार खायची तयारी ठेवावी” असं क्षत्रिय करणी सेनेचे संस्थापक राज शेखावत यांनी सोशल मीडियावर सांगितलं आहे.

राज शेखावत यांनी काय म्हटलं आहे?

व्हिडीओत राज शेखावत म्हणतात, “पुष्पा 2 ( Pushpa 2 ) हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात पुन्हा एकदा क्षत्रिय समाजाचा अपमान करण्यात आला आहे. शेखावत ही क्षत्रिय समाजातली जात आहे. या जातीला खालच्या दर्जाचं दाखवण्यात आलं आहे. तसंच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली क्षत्रिय समाजाला बदनाम केलं जातं आहे. सिनेमाच्या निर्मात्यांनी शेखावत शब्दाचा जो गैरवापर केला आहे तो थांबवावा अन्यथा मार खायला तयार रहावं. करणी सेना पुष्पा 2 ( Pushpa 2 ) च्या निर्मात्यांना घरात घुसून मारायलाही मागेपुढे पाहणार नाही. आम्ही आमचा अपमान कदापि सहन करणार नाही. वेळ पडल्यास कुठल्याही थराला जाऊ.” असं राज शेखावत यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- ‘पुष्पा द रुल’ हा सुकुमारचा सुमारपट! अल्लू अर्जुन-रश्मिकाच्या अभिनयाची जादूही फिकीच!

पुष्पा 2 हा सिनेमा मूळ तेलगु भाषेत आहे. हा सिनेमा विविध भाषांमध्ये डब करण्यात आला आहे. या सिनेमात रश्मिका मंदाना, अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पुष्पा हा सिनेमा सुपरडुपर हिट झाला. त्यानंतर लोक पुष्पा 2 ( Pushpa 2 ) या सिनेमाची आतुरतेने वाट बघत होते. या सिनेमाला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. अवघ्या चार दिवसात या सिनेमाने ४०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. या सिनेमाने जवान, पठाण या सिनेमांचेही रेकॉर्ड मोडले आहेत. पुष्पा 2 या सिनेमात पुष्पराज ही व्यक्तीरेखा अल्लू अर्जुनने साकारली आहे. तर भैरव सिंग शेखावत हे पात्र फहाद फासिलने साकारलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pushpa 2 news update rajput leader threatens pushpa 2 makers over use of shekhawat as insult to kshatriyas producer will be thrashed soon scj