बॉक्स ऑफिसवर एकाच दिवशी बिग बजेट सिनेमे प्रदर्शित झाले की, नेमका कोणता चित्रपट पाहायचा ही अडचण प्रेक्षकांच्या मनात निर्माण होते. साहजिकच याचा परिणाम चित्रपटांच्या संपूर्ण कलेक्शनवर होतो. गेल्यावर्षी अक्षय कुमारचा ‘OMG २’ आणि सनी देओलचा ‘गदर २’ हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले होते. अर्थात प्रेक्षकांनी दोन्ही चित्रपटांना भरभरून प्रतिसाद दिला. परंतु, ‘गदर २’च्या तुलनेत अक्षयच्या ‘OMG २’च्या कलेक्शनवर परिणाम झाला. आता अशीच काहीशी परिस्थिती येत्या ऑगस्ट महिन्यात निर्माण होणार आहे.

१५ ऑगस्ट, २६ जानेवारी, ख्रिसमस, ईद, दिवाळी अशा महत्त्वाच्या दिवशी कोणते सिनेमे प्रदर्शित होणार हे साधारणत: वर्षभरापूर्वीच घोषित केलं जातं. येत्या १५ ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. यापूर्वी रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम ३’ येत्या १५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. ( नुकत्याच जाहीर केलेल्या तारखेनुसार ‘सिंघम ३’ दिवाळीत प्रदर्शित होईल ) यामध्ये अजय देवगण, दीपिका पदुकोण, रणवीर सिंह, टायगर श्रॉफ, करीना कपूर खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्यामुळे ‘सिंघम’ सीरिजचे चाहते या चित्रपटाची आवर्जुन वाट पाहत आहेत. अशातच दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’ देखील १५ ऑगस्टला रिलीज होणार असल्याचं निर्मात्यांनी वर्षभरापूर्वीच जाहीर केलेलं आहे.

हेही वाचा : Video : “येऊ कशी प्रिया…”, आशा भोसलेंच्या जुन्या गाण्यावर थिरकली सोनाली कुलकर्णी; नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस

‘पुष्पा’ चित्रपटाच्या पहिल्या भागाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. त्यामुळे ‘पुष्पा २’ सुद्ध रेकॉर्डब्रेक कमाई करेल असा अंदाज कित्येक चित्रपट समीक्षकांनी वर्तवला आहे. यामध्ये अल्लू अर्जुनसह नॅशनल क्रश रश्मिका मंदाना प्रमुख भूमिकेत झळकेल. ‘पुष्पा २’ आणि ‘सिंघम ३’ एकाच दिवशी प्रदर्शित झाल्यास कोण बाजी मारणार यावर गेले अनेक महिने चर्चा चालू असतानाच आता या दोन्ही चित्रपटांना टक्कर द्यायला येतोय श्रद्धा कपूरचा ‘स्त्री २’.

‘मुंज्या’ चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर मॅडॉक फिल्म्सने ‘स्त्री २’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. हा चित्रपट सुद्धा १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. एकाच दिवशी तीन चित्रपट बॉक्स ऑफिसवर धडकल्यास शेवटी बाजी कोण मारणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल परंतु, निश्चितच तिन्ही सिनेमांना याचा काही अंशी फटका बसेल.

हेही वाचा : राधिका मर्चंटने प्री-वेडिंगमध्ये नणंद ईशा अंबानीसह केलेला भन्नाट डान्स, क्रुझवरचे Inside फोटो आले समोर

दरम्यान, बुधवारी ( १३ जून ) समोर आलेल्या माहितीनुसार ‘पुष्पा २’च्या प्रदर्शनाची तारीख बदलण्याची शक्यता आहे. एडिटिंगचं काही काम अपूर्ण राहिल्याने ‘पुष्पा २’ची रिलीज डेट निर्माते पुढे ढकलण्याची शक्यता काही मीडिया रिपोर्ट्सकडून वर्तवली जात आहे. याशिवाय ‘सिंघम ३’च्या प्रदर्शनाच्या तारखेत सुद्धा बदल केला आहे. परंतु, अद्याप ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या टीमने यावर अधिकृतरित्या घोषणा केलेली नाही. त्यामुळे सध्या तरी बॉक्स ऑफिसवर एकाच दिवशी बिग बजेट सिनेमे प्रदर्शित होणार असल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे.

Story img Loader