बॉलीवूडमधील आघाडीचा हिरो म्हणजे मनोज बाजपेयी. ‘सत्या’ चित्रपटात भिकू म्हात्रे नावाचं पात्र साकारून मनोज लोकप्रिय झाले. या चित्रपटात मुंबईच्या गँगस्टरची भूमिका उत्कृष्टपणे साकारल्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. आधी लहानमोठ्या भूमिका करणाऱ्या मनोज यांनी या चित्रपटानंतर मागे वळून पाहिलं नाही.

‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘सत्या’, ‘शूल’, ‘सत्यमेव जयते’, ‘सोनचिडिया’, ‘द फॅमिली मॅन’, ‘जोरम’, ‘किलर सूप’ अशा अनेक चित्रपट व वेब सीरिजमध्ये विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात व बॉलीवूडमध्ये स्वतःचं स्थान त्यांनी निर्माण केलं. इंडस्ट्रीतील आउटसायडर असलेले मनोज बाजपेयी फक्त आणि फक्त दमदार अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीतील स्टार कलाकारांच्या पंक्तीत जाऊन बसले.

मनोज बाजपेयींचा आज ५५ वा वाढदिवस आहे. तुम्ही त्यांचे चाहते असाल, त्यांचा अभिनय तुम्हाला आवडत असेल तर तुम्हाला त्यांचे सिनेमे नक्कीच माहित असतील. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त आम्ही एक क्विझ आणलंय, या क्विझमधील प्रश्नांची अचूक उत्तरं द्या आणि तुम्ही त्यांचे चाहते आहात, ते सिद्ध करा.

मनोज बाजपेयींच्या वाढदिवसानिमित्त या क्विझमध्ये सहभागी व्हा आणि तुमची अचूक उत्तरं नोंदवा.

Story img Loader