बॉलिवूडमध्ये टिपिकल अभिनेत्रीची परिभाषा बदलणारी आणि स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर करणारी आघाडीची अभिनेत्री विद्या बालनचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. वेगवेगळ्या धाटणीची भूमिका साकारून विद्याने मनोरंज क्षेत्रात स्वतःचं स्थान निश्चित केलं आहे. ‘द डर्टी पिक्चर’ मधील सिल्क स्मिताची भूमिका असो किंवा बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या आईची भूमिका असो, विद्या बालनने प्रत्येक भूमिका फार उत्कृष्टरित्या निभावली आहे.
नुकतंच तिने तिच्या ‘पा’ चित्रपटातील अमिताभ बच्चन यांच्या आईची भूमिका साकारण्याबद्दल भाष्य केलं आहे. ‘पा’ या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी १२ वर्षाच्या मुलाची भूमिका केली आहे ज्याला प्रोगेरिया हा आजार असतो ज्यामुळे लहान वयातच त्याची वाढ एका प्रौढ माणसासारखी होते. अशा मुलाच्या आईची भूमिका जेव्हा विद्याकडे आली तेव्हा सर्वप्रथम ती खूपच गोंधळली होती.
‘ह्यूमन्स ऑफ बॉम्बे’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये विद्या बालनने या भूमिकेला होकार कसा दिला याबद्दल खुलासा केला आहे. ती म्हणाली, “जेव्हा बल्की माझ्याकडे या चित्रपटाची ऑफर घेऊन आले तेव्हा ही नेमकी कथाच मला समजली नाही, बल्की थोडे वेडे आहेत का असाच संशय माझ्या मनात आला. त्यांनी मला अमिताभ बच्चन यांच्या आईची भूमिकेसाठी का विचारलं हेच मला कळत नव्हतं. हा असा एकमेव चित्रपट आहे ज्याची स्क्रिप्ट मी माझ्या मित्र मैत्रिणींना दाखवली, मग तो धक्का हळूहळू मी पचवला आणि मग मला समजलं की हे उत्कृष्ट कथानक आहे.”
विद्या पुढे म्हणाली, “एक कलाकार म्हणून मी ही भूमिका करण्यास खूप उत्सुक होते. त्यामुळेच मी इतरांचा सल्ला घेतला आणि त्यांनी मला ही भूमिका करायलाच हवी यासाठी प्रोत्साहनही दिले, त्यामुळेच या भूमिकेला होकार द्यायला मला थोडा वेळ लागला.” बघायला गेलं तर तेव्हाही अमिताभ बच्चन आणि विद्या बालन यांच्या वयात खूप मोठा फरक होता. ‘पा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही, पण समीक्षकांनी या चित्रपटाला उचलून धरलं. या चित्रपटात अमिताभ बच्चन, विद्या बालन, अभिषेक बच्चन, परेश रावल हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटातील भूमिकेसाठी अमिताभ यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला.