‘शैतान’, ‘३ इडियट्स’, ‘हिसाब बराबर’, ‘रहना है तेरे दिल में’, अशा अनेक चित्रपटांतून अभिनयाचा ठसा उमटवणारा, अशी अभिनेता आर. माधवन(R Madhavan)ची ओळख आहे. आता एका कार्यक्रमात अभिनेत्याने सोशल मीडियावर तो तरुण मुलींशी फ्लर्ट करतो, असा लोकांचा गैरसमज आहे, असे म्हटले. त्याबरोबरच त्याने हा गैरसमज होण्यामागे काय कारण आहे, याचाही खुलासा केला आहे. हा व्हिडीओ ‘रेडिट’वर शेअर करण्यात आला आहे.

अभिनेत्याने चैन्नईमध्ये पॅरेंट गिनी (Parent Geenee app) या अ‍ॅपच्या उद्धाटनादरम्यान सोशल मीडिया वापरताना त्याला कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागला. याबद्दल बोलताना म्हटले, “पालकांना हे माहीत पाहिजे की, त्यांच्या मुलांनी कधी सोशल मीडिया वापरला पाहिजे. मी एक उदाहरण देतो. मी एक अभिनेता आहे. मला खूप लोक इन्स्टाग्रामवर मेसेज करीत असतात. एका तरुण मुलीने मला मेसेज केला होता की, मी तुमचा अमुक अमुक चित्रपट पाहिला आहे. मला खूप आवडला. तुम्ही उत्तम अभिनेते आहात. तुम्ही मला प्रेरणा दिली आहे. या मेसेजनंतर खूप हार्ट आणि किसच्या इमोजी होत्या. आता एका चाहत्याने इतक्या चांगल्या पद्धतीने बोलल्याने मी त्या मेसेजला उत्तर दिले. मी मेसेजमध्ये लिहिले खूप खूप धन्यवाद! तुम्ही दयाळू आहात. देव तुमचं भल करो. तिने काय केले मी रिप्लाय दिलेला मेसेजचा स्क्रीनशॉट काढला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला. लोकांनी काय पाहिलं, तर हार्ट व किस इमोजी असलेल्या मेसेजला मी उत्तर दिलं. लोक असे म्हणू लागले की, मॅडीने हार्ट व किस इमोजी असलेल्या मेसेजला रिप्लाय दिला. माझा उद्देश त्या इमोजींना उत्तर देण्याचा नव्हता; तर तिने लिहिलेल्या मेसेजला देण्याचा होता. पण, लोकांचा असा गैरसमज झाला की, मॅडी तरुण मुलींशी सोशल मीडियावर बोलतो. त्यामुळे सोशल मीडियावर प्रत्येक वेळी मेसेज करताना मला भीती वाटते.

आर. माधवन इंडियाज लोकेशन बेस्ड पॅरेंटल कंट्रोल अ‍ॅपमध्ये गुंतवणूकदार व स्ट्रॅटिजिक पार्टनर आहे. अभिनेत्याच्या कामाविषयी बोलायचे, तर तो नुकताच ‘हिसाब बराबर’मध्ये दिसला होता. हा चित्रपट बँक स्कॅमवर आधारित होता.आगामी काळात तो अनेक हिंदी व तमीळ चित्रपटांत दिसणार आहे. तमीळमध्ये तो लवकरच ‘अधीरशतासाली’ व ‘टेस्ट’मध्ये दिसणार आहे. हिंदी चित्रपटांबाबत बोलायचे, तर तो ‘अम्रिकी पंडित’, ‘दे दे प्यार दे २’ , ‘केसरी चॅप्टर २’ व ‘धुरंधरमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, शैतान या चित्रपटातील त्याच्या नकारात्मक भूमिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले.

Story img Loader