अभिनेता आर. माधवनने ‘मिन्नले’ (आणि त्याचा हिंदी रिमेक ‘रहना है तेरे दिल में’) यांसारख्या चित्रपटांतून त्याच्या करिअरची सुरूवात केली. एक साधा, सर्वांना आपलासा वाटणारा मुलगा अशा भूमिका करत त्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. कालांतराने त्याने खऱ्या जीवनाशी साम्य असलेल्या (सर्वसामान्य नायकाच्या) पात्रांवर आधारित भूमिका केल्या. त्याचा नवीन चित्रपट ‘हिसाब बराबर’ही त्याला अपवाद नाही. झी5 वरील या चित्रपटात तो रेल्वे तिकीट तपासणी अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहेत.

चित्रपट आणि वास्तविक जीवनाशी साम्य किंवा संबंध असलेल्या भूमिकांबद्दल ‘हिंदुस्तान टाइम्स’शी संवाद साधताना, माधवनने अद्यापही तो सिनेसृष्टीत कसा टिकला आणि आजही त्याच्या भूमिका लोकांना आपल्याशा का वाटतात, यासह त्याचे सिनेमे लोकांना कनेक्ट का होतात (प्रासंगिक का वाटतात?) याबद्दल वक्तव्य केले आहे. गेल्या दशकभरात माधवन मोजक्याच हिंदी चित्रपटांमध्ये दिसला आहे. विशेष म्हणजे, ‘तन्नू वेड्स मन्नू रिटर्न्स’नंतर त्याचा ‘हिसाब बराबर’ हा चौथा बॉलीवूड चित्रपट आहे. ‘तन्नू वेड्स मन्नू रिटर्न्स’ दशकभरापूर्वी प्रदर्शित झाला होता.

Larsen & Toubro (L&T) loses a significant Rs 70,000 crore submarine deal after CEO's controversial 90-hour workweek statement.
L&T ला धक्का, सरकारने रद्द केली ७० हजार कोटींची निविदा; कर्मचाऱ्यांनी ९० तास काम करावे म्हणाल्याने कंपनी चर्चेत
Mahakumbh 2025 Mamta Kulkarni Kinnar Akhada
Mahakumbh 2025: इंजिनीअर्स, डॉक्टर्स व तरुणांना किन्नर आखाड्याचे आकर्षण का?
Rajul Patel join eknath Shinde Shiv Sena
Rajul Patel : ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का; ‘या’ महिला नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
Twinkle Khanna
“अक्षय कुमार असा लहान मुलगा…”, राजकीय विचारसरणी वेगळी असल्याच्या प्रश्नांवरून ट्विंकल खन्नाचा संताप, म्हणाली…
Yoga Centre Descent Into Sex Cult Woman Told The Story
Sex Racket : १००० कुमारिकांशी शय्यासोबत करण्याची भोंदू योग गुरूची मनिषा; सेक्स रॅकेट उघड
Delhi Crime
Delhi Crime : चुलत बहिणीशी प्रेमसंबंध, लग्नाचा तगादा लावल्याने हत्या, मृतदेह सुटकेसमध्ये टाकून…; पोलिसांनी ‘असा’ लावला घटनेचा छडा
_sex parties at davos
सेक्स पार्टी अन् नऊ कोटींमध्ये मुलींची बुकिंग; दावोस परिषदेदरम्यानचा धक्कादायक अहवाल समोर, प्रकरण काय?
Loksatta editorial challenges before fm nirmala sitharaman in union budget 2025
अग्रलेख: सीतारामन ‘सिंग’ होतील?

माधवन म्हणाला, “मधल्या काळात मी वेगवेगळ्या प्रकारचे लोक शोधून त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला.” आपल्या निरीक्षणामुळे प्रासंगिक राहण्यास मदत झाली, असे त्याने नमूद केले . माधवन पुढे म्हणाला, “माझ्याकडे सिक्स पॅक अॅब्स किंवा डान्स करण्याची क्षमता यासारखे हिरोमध्ये असणारे गुण नाहीत. तरीही, मी २५ वर्षांनंतरही प्रासंगिक राहू शकलो, याचे कारण म्हणजे जगातील सगळ्यात कठीण पिढीचे योग्य प्रकारे प्रतिनिधित्व करण्याची क्षमता माझ्यात आहे,” असे तो म्हणाला .

ही पिढी इतकी वेगळी का आहे, यावर तो सविस्तर बोलताना म्हणाला, “माझ्या पिढीतील जगभरात असणाऱ्या भारतीयांची मध्यमवर्गीय संस्कारातून जडणघडण झाली आहे. या पिढीतील लोक राजकारण किंवा व्यवसाय , ते जवळपास प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. आम्ही जग झपाट्याने बदलताना पाहिले आणि त्याला सामोरे जाण्याचे आव्हान स्वीकारले. एसटीडी बूथपासून पेजर आणि स्मार्टफोनपर्यंतचा प्रवास आमच्या आयुष्यात घडला आहे. आम्ही प्रासंगिक राहण्यासाठी (बदलत्या काळाशी कनेक्टेड राहण्यासाठी) संघर्ष केला आहे.”

माधवन पुढे सांगतो, जेनरेशन एक्सच्या सामान्य माणसाचे प्रतिनिधित्व करणे ही त्याने स्वतःची खासियत बनवली आहे. “या पिढीतील सशक्त सामान्य माणसाचे प्रतिनिधित्व करणारे खूप कमी अभिनेते आहेत. सामान्य माणूस आता ‘बिचारा’ राहिलेला नाही, आणि अशा भूमिका कशा साकारायच्या, याचा मी सातत्याने अभ्यास केला आहे,” असे त्याने नमूद केले.

माधवन म्हणाला, चित्रपटांमध्ये निवडक काम करण्याच्या निर्णयामुळे अनेक आव्हान येतात. तो पुढे म्हणाला, “मी प्रासंगिक राहण्याचे कौशल्य शिकलो आहे. तुम्ही वर्षं चित्रपटांमध्ये काम केलं नाही, तर लोक तुम्हाला विसरतील, कारण स्पर्धा खूप आहे. परंतु जर तुम्ही स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली असेल, तर तुम्ही टिकाल.”

अश्विनी धीर दिग्दर्शित ‘हिसाब बराबर’ यात एका सामान्य माणसाची कथा आहे, जो एका खासगी बँकेतील मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यासाठी धाडस करतो. माधवनव्यतिरिक्त या चित्रपटात नील नितिन मुकेश, कीर्ती कुल्हारी आणि रश्मी देसाई यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट २४ जानेवारी २०२५ रोजी ‘झी5’ वर प्रदर्शित झाला.

Story img Loader