आर. माधवन बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. साऊथबरोबर आर माधवनने हिंदीमध्येही अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. लवकरच आर माधवनची द रेल्वे मॅन वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेबसिरीजमध्ये आर माधवनबरोबर जुही चावलाची मुख्य भूमिका आहे. दरम्यान आर माधवनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आर माधवनने त्याच्या क्रशबाबत खुलासा केला आहे.
हेही वाचा- भूमी पेडणेकरला डेंग्यूची लागण; अभिनेत्री माहिती देत म्हणाली, “मित्रांनो सावध …”
व्हिडीओमध्ये आर माधवन जुही चावलाबाबत बोलताना दिसत आहे. आर माधवन म्हणाला, “जेव्हा मी ‘कयामत से कयामत तक’ चित्रपट बघितला तेव्हाच मी आईला म्हणालो की, मला या अभिनेत्रीबरोबर लग्न करायचं आहे. माझं हे बोलणं ऐकून आई जोरजोरात हसायला लागली. पण त्यावेळेस जुई चावला यांच्याशी लग्न करण्याच माझं एकमेव ध्येय होतं.” आर माधवनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
‘द रेल्वे मॅन’ बद्दल सांगायचे झाले तर, या वेबसिरीजमध्ये आर माधवन आणि जुही चावला व्यतिरिक्त केके मेनन, बाबिल खान, दिव्येंदू शर्मा आणि दिव्येंदू भट्टाचार्य यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. शिव रवैल यांनी या वेबसिरीजचे दिग्दर्शन केले आहे.