बॉलिवूड स्टार्स आणि त्यांची मुलं देखील सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. जवळपास सगळेच स्टार किड्स आपल्या आई- वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये पदार्पण करताना दिसतात. पण अभिनेता आर माधवनच्याबाबतीत मात्र असं अजिबात घडलेलं नाही. दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरहिट चित्रपट देणाऱ्या आर माधवनचा मुलगा वेदांतने मात्र अभिनय नाही तर स्विमिंगमध्ये आपलं करिअर करण्याचं ठरवलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नुकतंच वेदांतने ‘खेलो इंडिया यूथ गेम्स २०२३’ या स्पर्धेत ३ सुवर्ण आणि २ रौप्य पदकं जिंकली आहेत. आपल्या मुलाची ही कामगिरी बघून माधवन प्रचंड खुश आहे आणि त्याने त्याचा आनंद ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. माधवनने वेदांतचा हातात ट्रोफी असलेला त्या कार्यक्रमातील फोटो शेअर करत वेदांतचं अभिनंदन केलं आहे.

आणखी वाचा : ‘बाहुबली’मधील ‘भल्लालदेव’ अडचणीत; अभिनेता आणि त्याच्या वडिलांवर लागलेत जमीन बळकावण्याचे आरोप

वेदांतने १०० मीटर, २०० मीटर आणि १५०० मीटरमध्ये सुवर्णपदक पटकावलं आहे, तर ४०० आणि ८०० मीटर स्विमिंगमध्ये त्याला २ रौप्य पदक मिळाली आहेत. माधवनने ही पोस्ट शेअर करत वेदांतसह या स्पर्धेत भाग घेतलेल्या आणि जिंकलेल्या इतर मुलांचेही अभिनंदन केले आहे. ही पोस्ट शेअर करताना माधवनला आपल्या मुलाचा प्रचंड अभिमान वाटत आहे आणि ते त्याच्या पोस्टमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.

‘खेलो इंडिया यूथ गेम्स’मध्ये वेदांतने महाराष्ट्र राज्याचं नेतृत्त्व केलं होतं. याबरोबरच या स्पर्धेतही महाराष्ट्राच्या संघाने विजय मिळवत ट्रोफी जिंकलेली आहे. लहानपणापासूनच माधवनच्या मुलाला अभिनयात अजिबात रस नाहीये. वेदांतने खेळात आपल्या राज्याचं आणि देशाचं नाव खूप मोठं करावं यासाठी माधवन त्याला हरतऱ्हेने प्रोत्साहन देत असतो.