बॉलिवूड कलाकार आणि त्यांची मुलं हा सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय असतात. अनेक स्टार किड्स आपल्या आई- वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये पदार्पण करताना दिसतात. पण अभिनेता आर माधवनच्या बाबतीत मात्र असं घडलेलं नाही. दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या आर माधवनचा मुलगा वेदांत देशासाठी मेडल जिंकतोय. तो स्विमिंगमध्ये गोल्ड मेडल्स जिंकत आपल्या वडिलांचं आणि देशाचं नाव देखील उज्ज्वल करताना दिसत आहे. नुकतेच वेदांतनं स्विमिंगमध्ये पाच गोल्ड मेडल्स जिंकले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Video: सिनेमात नाही पण, जाहिरातीत झळकली शाहरुखची लेक, सुहानाच्या व्हिडीओवर गौरी खानची कमेंट चर्चेत

आर माधवनने एक पोस्ट व काही फोटो शेअर करत मुलाच्या कामगिरीची माहिती दिली आहे. “देवाच्या कृपेने आणि तुमच्या सर्व शुभेच्छांनी वेदांतने क्वालालंपूर येथे या शनिवार व रविवारी आयोजित मलेशियन इन्व्हिटेशन एज ग्रूप चॅम्पियनशिप, २०२३मध्ये भारतासाठी ५ सुवर्ण (५० मी, १०० मी, २०० मी, ४०० मी आणि १५०० मी) पदकं जिंकली. मी खूप आनंदित आणि कृतज्ञ,” असं माधवनने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

आर माधवनचा मुलगा व राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू असलेल्या वेदांतच्या या कामगिरीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. चाहत्यांसह राजकीय नेतेमंडळीही वेदांतचं कौतुक करताना दिसत आहेत.

दरम्यन, वेदांतने देशासाठी पदकं जिंकण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी त्याने फ्रिस्टाइल नॅशनल ज्युनिअर रेकॉर्ड मोडला होता, तसेच अनेक देशांमध्ये आयोजित स्पर्धेत देशासाठी सुवर्ण पदकासह इतर पदकंही जिंकली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: R madhavan son vedaant won 5 gold medal at malaysian invitational age group championships 2023 hrc
Show comments