भारतीय रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने शुक्रवारी मोठा निर्णय घेत २ हजारांच्या नोटांची छपाई बंद करण्याचे आदेश दिले आहेत. ग्राहकांना २३ मे २०२३ ते ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत या नोटा बॅंकांमध्ये बदली करता येणार आहेत. आरबीआयने २ हजारांच्या नोटा चलनातून बाद केल्यावर सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल झाले. सोशल मीडियावर प्रत्येकजण यावर व्यक्त होताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेता आर माधवन यानेही नुकतंच या संदर्भात एक स्टोरी सोशल मीडियावर शेअर केली आहे. आर माधवन हा बऱ्याचदा अशा मुद्द्यांवर भाष्य करतो आणि स्वतःचं मत मांडतो. यंदाही त्याने अशीच एक गोष्ट काहीशा गंमतीशीर पद्धतीने शेअर केली आहे.

आणखी वाचा : “हा फॅशन शो नाही…” विवेक अग्निहोत्री यांनी ‘Cannes Festival’मध्ये हजेरी लावणाऱ्या बॉलिवूड सेलिब्रिटीजची केली कानउघडणी

या स्टोरीमध्ये माधवनने नुकतंच आपल्या गाडीत डिझेल भरलं असून त्यासाठी २००० रुपयांच्या नोटा दिल्याचं स्पष्ट केलं आहे. याबद्दल लिहिताना मात्र माधवन लिहितो, “६००० रुपयांचं डिझेल भरलं आणि पेट्रोल पंपावर २००० च्या तीन नोटा दिल्या. हे पैसे देताना शप्पथ अशी भावना मनात आली की जणू ३ मृतदेहांचीच विल्हेवाट लावत आहे.”

फोटो : सोशल मीडिया

हसणाऱ्या इमोजी शेअर करत माधवनने ही स्टोरी त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटला शेअर केली आहे. सोशल मीडियावर बरीच मंडळी याबद्दल व्यक्त होत आहेत, तर काही लोक या नोटाबंदीची तुलना आधीच्या नोटाबंदीशी करत आहेत. सध्यातरी सगळ्यांनाच त्यांच्याजवळ असलेल्या २००० रुपयांच्या नोटांची चिंता आहे, या नोटा २३ मे पासून बँकांमध्ये बदलता येणार आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: R madhavan spends 2000 rupee notes on petrol pump shares cryptic post on social media avn