जुलै महिन्यामध्ये आर माधवनचा “रॉकेट्री: द नंबी इफेक्ट’ हा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये त्याने इस्रो संस्थेमधील शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांची भूमिका साकारली आहे. त्याच्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी पसंती दाखवली. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगले कलेक्शन केले. चित्रपटाच्या लेखनाची आणि दिग्दर्शनाची जबाबदारीही त्याने ताकदीने उचलली. या चित्रपटाद्वारे एक वेगळा प्रयोग केल्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

माधवन सध्या दुबईमधील अबू धाबी शहरामध्ये आहे. या शहरामध्ये ‘एनबीए अबू धाबी २०२२’ या बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमधील सामने पाहण्यासाठी अभिनेता रणवीर सिंहदेखील दुबईला पोहोचला होता. एका सामन्यादरम्यान माधवन आणि रणवीर एकमेकांना भेटले. त्यांनी एकत्र सामन्याचा आनंद घेतला. माधवनने त्यांच्यासह सेल्फी काढून सोशल मीडियावर पोस्ट केला. या फोटोला त्याने ‘खूप प्रेम माझ्या भावा’ असे कॅप्शन दिले.

आणखी वाचा – वडिलांचा फोटो पाहताच ढसाढसा रडल्या गौरी सावंत, म्हणाल्या “तुमच्यासारखा बाप…”

माधवनने ट्वीट केलेला हा सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोच्या कमेंट बॉक्समध्ये निरनिराळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. रणवीर सिंहसह फोटो काढल्यामुळे एका यूजरने माधवनला त्रास देण्याचा प्रयत्न केला. त्याने सेल्फीखाली “आता मी तुला अनफॉलो करणार” अशी कमेंट केली. त्यानंतर माधवनने त्याला प्रतिउत्तर देत “मला गरज आहे. मी करतो” असे म्हटले. त्यांच्या या कृतीची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे.

आणखी वाचा – राखी सावंतला बनायचे आहे मुख्यमंत्री, पद मिळाल्यावर सर्वात आधी करणार ‘हे’ काम

त्यांच्या एका चाहत्याने “तू पहिल्या रांगेमध्ये नव्हतास.. तुझ्याभोवती अनोळखी लोक होते.. कोणीही तुला सेलिब्रिटीसारखी वागणूक देत नव्हतं. हा अनुभव कसा होता?” असा सवाल केला. याचे उत्तर देताना माधवनने “सेलिब्रिटी नसल्याची भावना फार अद्भुत असते. पण मला सेलिब्रिटी म्हणून वावरणं जास्त आवडतं” अशी प्रतिक्रिया दिली. दुसऱ्या चाहत्याने ‘दोन स्टार एका फोटोमध्ये’ अशी कमेंट केली. सोशल मीडियावरील बऱ्याच चाहत्यांना ‘तुम्ही एकत्र काम कधी करणार’ हा प्रश्न अनेकदा विचारला.