बॉलिवूडचा चॉकलेट हिरो म्हणून अभिनेता शाहिद कपूरला ओळखले जाते. शाहिद कपूरने त्याच्या अभिनयासह स्मितहास्याने अनेक मुलींची मनं जिंकून घेतली. शाहिद हा सध्या सिनेसृष्टीपासून दूर असला तरी त्याचा चाहता वर्ग अद्याप कायम आहे. शाहिदने फक्त सर्वसामान्य मुलींच्या नव्हे तर अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनाही वेड लावलं होतं. एका ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्याची मुलगी शाहिद कपूरच्या प्रेमात पडली होती. यामुळे शाहिदला पोलिसात तक्रार दाखल करावी लागली होती.
शाहिद कपूर हा अनेक सर्वसामान्य मुलींसह अभिनेत्रींचा क्रश आहे. सध्या शाहिद हा त्याच्या फर्जी या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. नुकतंच शाहिद कपूरच्या खासगी आयुष्यातील एक किस्सा समोर आला आहे. यात शाहिदला कशाप्रकारे एकतर्फी प्रेमाचा त्रास सहन करावा लागला होता. शाहिदवर एकतर्फी प्रेम करणारी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती वास्तविकता पंडित होती.
आणखी वाचा : “शाहिद कपूरला अरेंज मॅरेजबद्दल कल्पनाच नव्हती…” दिग्दर्शकाने सांगितला ‘विवाह’ चित्रपटाच्या शूटींगचा किस्सा
प्रसिद्ध अभिनेते राज कुमार यांची मुलगी वास्तविकता पंडित ही शाहिद कपूरच्या प्रेमात वेडी झाली होती. ती शाहिदच्या इतक्या प्रेमात पडली होती की तो जिथे जिथे जायचा, त्याच्या मागे ती देखील तिकडे जायची. तिने शाहिदला स्टॉकही केले होते. वास्तविकता पंडित आणि शाहिद कपूर यांची पहिली भेट कोरिओग्राफर श्यामक डाबर यांच्या डान्स क्लासमध्ये झाली होती. त्यावेळी तिला पहिल्या नजरेतच शाहिद आवडला होता.
अनेक मीडिया रिपोर्टसनुसार, वास्तविकता पंडितला शाहिद कपूर इतका आवडायचा की तिने त्याच्या घराजवळ एक घरही घेतले होते. त्यावेळी शाहिद कुठेही गेला तरी ती त्याच्या मागे जायची. अनेकदा तर ती शाहिद कपूरच्या गाडीच्या बोनेटवर बसायची. शाहिदसाठी वास्तविकताने अभिनयाचे क्लासेस, डान्स क्लासेसही सोडले होते. ती रात्रंदिवस शाहिदच्या अपार्टमेंटजवळ असायची. वास्तविकताचे शाहिदवर एकतर्फी प्रेम होते.
सुरुवातीला शाहिदने याकडे दुर्लक्ष केले. पण नंतर दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर झाली. एक दिवस शाहिद कपूर हा प्रचंड नाराज झाला. त्याने वास्तविकता पंडितच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल केली होती. यानंतर मात्र तिने शाहिदला फॉलो करणे बंद केले.
आणखी वाचा : “तू माझा…” वरुण धवनच्या ‘त्या’ पोस्टनंतर आलिया भट्ट संतापली, कारण…
दरम्यान वास्तविकता पंडितने १९९६ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण तिला चित्रपटात तितके यश मिळाले नाही. ज्येष्ठ अभिनेते राजकुमार हे तिचे वडील असतानाही तिला कामासाठी फिरावं लागलं. यानंतर २००० मध्ये लॉरेन्स डिसूझाने ‘दिल भी क्या चीज है’ या चित्रपटासाठी तिला साईन केले होते. त्याने काही काळ या चित्रपटाचे शूटिंग देखील केले होते. पण त्याला तिचे काम आवडले नाही, त्यामुळे त्याने तिला रिप्लेस करत दुसऱ्या अभिनेत्रीबरोबर हा चित्रपट केला होता. आता वास्तविकता कुठे आहे, काय करते याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही.