बॉलिवूड अभिनेत्री काही निवडक बिनधास्त अभिनेत्रींमध्ये गणली जाते. तिने ‘सेक्रेड गेम्स’, ‘लस्ट स्टोरीज’ या वेबसीरिज तसेच ‘अंधाधुन’, ‘फोबिया’ यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अलिकडेच राधिका आपटे ‘विक्रम वेधा’ चित्रपटात सैफ अली खानसह दिसली होती. राधिका आपटे तिच्या करिअरबरोबरच तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असते. राधिका आपटेनं १० वर्षांपूर्वी ब्रिटिश म्यूझिशियनशी लग्न केलं होतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिपवर भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राधिका आपटेने ‘बॉलिवूड हंगामा’ दिलेल्या मुलाखतीत आपल्या लग्नाबाबत भाष्य केलं आहे. राधिकाने ब्रिटिश म्यूझिशियन बेनेडिक्ट टेलरशी २०१२ मध्ये लग्न केलं होतं. तिने या मुलाखतीत सांगितलं की, करोना महामारीच्या अगोदर म्हणजे २०२० पर्यंत जवळपास ८ वर्षे ती लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये होती. आता राधिका तिचा जास्तीत जास्त वेळ लंडनमध्ये घालवताना दिसते. ‘विक्रम वेधा’च्या प्रमोशनसाठी अलिकडे भारतात परतली होती. अशात तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या लग्नावर चर्चा केली.

आणखी वाचा- “तेव्हा राधिका आपटेने मला अर्ध्या झोपेतून…”, सोनाली कुलकर्णीने सांगितला ‘तो’ किस्सा

राधिका म्हणाली, “लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिप खूपच कठीण आहे. आम्ही दोघांनीही या नात्यासाठी मार्ग शोधला जेणेकरून ते चालत राहील. जेव्हा कोविडची लाट आली. त्या काळापर्यंत मी लॉन्ग डिस्टन्स लग्नाच्या नात्यात होतो. आता आम्ही एकमेकांना बराच वेळ देत आहोत. हा आमच्या लग्नाचा दुसरा चॅप्टर आहे. सुरुवातीला एकामेकांपासून दूर राहणं खूप वेदनादायी होतं. आता मला वाटतं की त्याच्यापासून एक क्षणही दूर राहणं मला शक्य नाही. कारण हे खूपच वेदनादायी आहे. आता आम्ही एकमेकांना जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करतो.”

आणखी वाचा- “आपल्या जोडीदाराला…” राधिका आपटेने सांगितले सुखी वैवाहिक जीवनाचे रहस्य

राधिका पुढे म्हणाली, “अशाप्रकारचं नातं सांभाळणं खूपच कठीण असतं. पण जर तुम्ही यावर काम केलं तर तुम्ही सर्व चांगल्या पद्धतीने सांभाळू शकता. आम्ही हेच केलं. पण आम्ही हे सगळं कसं केलं हे मला माहीत नाही. आम्हाला एकमेकांना वेळ देणं आवडत होतं. कधी कधी तुम्हाला एकमेकांना मोकळं सोडावं लागतं अशा नात्यासाठी जे तुम्हाला हवं आहे. जसे आहात तसेच स्वतःला स्वीकारा आणि समोरच्या व्यक्तीलाही स्वीकारा. हेच मी एका यशस्वी नात्यातून शिकले आहे.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Radhika apte open up about her long distance marriage life mrj