राधिका आपटे चित्रपटसृष्टीतील तिच्या कामाबरोबरच तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. राधिका आपटेने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. पण नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राधिका आपटेने तिच्या करिअरबद्दल अनेक धक्कदायक खुलासे केले आहे. आतापर्यंतच्या करिअरमध्ये आपल्याला अनेक भूमिका गमवाव्या लागल्या आहेत असंही या मुलाखतीत राधिकाने म्हटलं आहे. त्याचबरोबर तिने यामागचं कारणही स्पष्ट केलं आहे. राधिकाच्या मते बॉलिवूडमध्ये वयाचा मुद्दा खूप महत्त्वाचा असून मोठ्या व्यावसायिक चित्रपटांसाठी तरुण अभिनेत्रींना विचारणा होते.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राधिकाने सांगितलं की तिने करिअरमध्ये अनेकदा अशा परिस्थितीचा सामना केला आहे. अनेकदा लोकांनी तिला या भूमिकेसाठी तरुण अभिनेत्री योग्य आहेत असं स्पष्ट शब्दात सांगितलं आहे. अर्थात या सर्व गोष्टींमुळे फारसा फरक पडला नाही. “मी काम मिळवण्यासाठी किंवा मुख्य भूमिका मिळवण्यासाठी कधीच कॉस्मेटिक किंवा प्लास्टिक सर्जरी करण्याबाबत विचार केला नाही.” असंही यावेळी राधिकाने सांगितलं. राधिकाचं म्हणणं आहे की पूर्वीच्या तुलनेत आता परिस्थिती बरीच बदलली आहे. आता वय आणि साइज या गोष्टींनी फारसा फरक कोणाला पडत नाही.
आणखी वाचा- “गावातली मुलगी ते सेक्स कॉमेडी…” राधिका आपटेने मांडलं स्वतःच्या बोल्ड भूमिकांबद्दलचं मत
राधिकाचा ‘मोनिका ओ माय डार्लिंग’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. अलिकडेच राधिकाने सिद्धार्थ काननला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, ‘वय ही एक अशी गोष्ट आहे ज्यावर या इंडस्ट्रीमध्ये खूप लक्ष केंद्रित केले जाते. त्यांना तरुण चेहरा हवा असतो. लोक अशा विचित्र मागण्या करतात की अनेकदा या सगळ्याचा अर्थ काय असे वाटते. आजच्या युगात काम मिळवण्यासाठी किंवा सुंदर दिसण्यासाठी शस्त्रक्रिया करणारे बरेच कलाकार आहेत. हे केवळ भारतातच नाही तर जगभर घडत आहे. मात्र आजही अनेक महिला अशा शस्त्रक्रियेविरुद्ध लढा देत आहेत.
आणखी वाचा- मराठी चित्रपटसृष्टीकडे पाठ फिरवलीस का? राधिका आपटे म्हणते, “मागच्या ३ वर्षांत मला…”
आपला मुद्दा मांडताना राधिका म्हणाली, “पूर्वीच्या तुलनेत खूप बदल झाला आहे. ब्रँड्सनी आता सर्व वयोगटातील स्त्री-पुरुषांना प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली आहे. पण एक वेळ अशी होती की मी या सर्व गोष्टींसाठी खूप संघर्ष केला. फक्त मीच नाही तर या सगळ्याचा सामना करणारे अनेक लोक आहेत. पण मला एक गोष्ट माहित आहे की तुम्ही लोकांना फॉलो करता, त्यामुळे तुमच्या निर्णयावर ठाम राहा. कारण यावर सर्व काही अवलंबून आहे.