उद्योगपती मुकेश अंबानी व नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीचा राधिका मर्चंटशी साखरपुडा पार पडला. अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या साखरपुडा सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. बॉलिवूड किंग शाहरुख खानची पत्नी पत्नी गौरी खान व मुलगा आर्यन खानही या शाही सोहळ्यासाठी उपस्थित होती.
अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या साखरपुडा सोहळ्यातील गौरी खान व आर्यन खानचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. इन्स्टंट बॉलिवूड या इन्स्टाग्राम पेजवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये गौरी खान मुलगा आर्यन खानसह पापाराझींना फोटोसाठी पोझ देताना दिसत आहे. फोटो काढून झाल्यानंतर आर्यन आई गौरीला सोडून एकटाच पुढे गेल्याच व्हिडीओत पाहायला मिळत आहे. आर्यनच्या या कृतीमुळे नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं आहे.
हेही वाचा>> ‘वेड’ चित्रपटाची ५० कोटींची कमाई पाहून सिद्धार्थ जाधव भारावला, पोस्ट शेअर करत म्हणाला…
हेही पाहा>> Birthday Special: गौरव मोरेला केसांमुळे मिळालेली गुगलची जाहिरात; स्वत:च सांगितलेला किस्सा
गौरी खान व आर्यनच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. “आईला सोडूनच पुढे निघून गेला, एवढी कसली घाई”, अशा आशयाच्या कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. अनेकांनी फोटोसाठी आर्यन खानने स्माइल न दिल्यामुळेही त्याला ट्रोल केलं आहे. “आर्यन खान नेहमीच रागात का असतो”, अशी कमेंट एकाने केली आहे. “नशेत पडू नकोस”, अशी कमेंट करत अनेकांनी आर्यन खानने नशा केल्याचं म्हटलं आहे.
हेही वाचा>> “जगातील सगळ्यात…”, पोलिसांकडून सुटका झाल्यानंतर राखी सावंतची पहिली पोस्ट
मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणामुळे प्रकाशझोतात आलेला आर्यन खान लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. परंतु, अभिनेता म्हणून नाही तर दिग्दर्शन क्षेत्रात आर्यन त्याचं नशीब आजमवणार आहे.