Anant Ambani Radhika Merchant Pre-Wedding: अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा काही दिवसांपूर्वी प्री-वेडिंग सोहळा मोठ्या थाटामाटात, जल्लोषात पार पडला. १ मार्च ते ३ मार्चपर्यंत हा प्री-वेडिंग सोहळा गुजरात येथील जामनगरमध्ये आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला हॉलीवूड, बॉलीवूड, राजकीय, क्रिडा, उद्योग क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित राहिली होती. या सोहळ्यानंतर खास रिलायन्स कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी अंबानींना खास कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी देखील अनेक कलाकार मंडळी पाहायला मिळाले. अनंत व राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याची चर्चा अजूनही जोरदार सुरू आहे. नवनवीन फोटो, व्हिडीओ समोर येत आहेत. सध्या राधिका व शाहरुख खानच्या डान्स व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग सोहळ्याच्या पहिल्या दिवशी, १ मार्चला जगप्रसिद्ध पॉप स्टार रिहानाचा परफॉर्मन्स झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी संगीत सोहळा झाला. यामध्ये बॉलीवूडच्या सेलिब्रिटींनी जबरदस्त परफॉर्मन्स केला. बॉलीवूडचे तीन खान ‘नाटू नाटू’ या गाण्यावर डान्स करताना दिसले. तर रणबीर कपूर-आलिया भट्ट आकाश अंबानी-श्लोका मेहतासह ‘केसरिया’ या गाण्यावर थिरकले. तिसऱ्या दिवशी, ३ मार्चला ‘टस्कर ट्रेल्स’ आणि ‘हस्ताक्षर’ कार्यक्रम झाला. ‘टस्कर ट्रेल्स’ हा आउटडोअर कार्यक्रम होता. ज्याद्वारे पाहुण्यांना जामनगर, वनतारा फिरवलं. रात्री भव्य महाआरती आणि अनंत-राधिका यांची हस्ताक्षर सेरेमनी पार पडली. यानंतर स्वरांची उधळण झाली. प्रसिद्ध गायकांनी आपल्या सुमधूर आवाजाने पाहुण्यांना मंत्रमुग्ध केलं आणि नाचायलाही भाग पाडलं. अ‍ॅकॉनच्या ‘छम्मक छल्लो’ गाण्यावर अंबानींची होणारी सून शाहरुख खानबरोबर थिरकताना दिसली. याचा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘मानव मंगलानी’च्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Rahul Gandhi Criticized Mohan Bhagwat
Rahul Gandhi :”…तर मोहन भागवतांना अटक झाली असती”, राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
Maharashtrachi Hasyajatra Shivali Parab sent mangala movie trailer to Bollywood celebrity on instagram
शिवाली परबने शाहरुख खानपासून ते जॅकी जॅनपर्यंतच्या कलाकारांना पाठवला ‘मंगला’ चित्रपटाचा ट्रेलर; सयाजी शिंदेंचं आलं प्रत्युत्तर, म्हणाले…
hasan mushrif ajit pawar (1)
“…तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत”, हसन मुश्रीफांचं वक्तव्य
Tharla Tar Mag Fame Actors Dance Video
“मुझको क्या हुआ है…”, ‘ठरलं तर मग’ फेम चैतन्य अन् कुसुमचा शाहरुख खानच्या गाण्यावर जबरदस्त डान्स! कमेंट्सचा पाऊस…
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
Anil Deshmukh criticized BJP and amit shah
अमित शहां यांना अनिल देशमुखांचे चोख उत्तर म्हणाले,”शिवसेना, राष्ट्रवादी फोडणारा भाजपच दगाबाज “

हेही वाचा – अनंत यांच्या होणाऱ्या सासूबाई नीता अंबानींप्रमाणे आहेत खूप सुंदर, राधिका मर्चंटची आई काय करते? वाचा…

या व्हिडीओत, शाहरुख व राधिका मर्चंट ‘छम्मक छल्लो’ गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. दोघांचा हा व्हिडीओ नेटकऱ्यांना खूप आवडला आहे. ‘राधिका जगातली भाग्यवान मुलगी आहे’, ‘राधिका खूप क्यूट आहे’, ‘राधिका लहान मुलांप्रमाणे नाचतेय. तिचा आनंद गगनात मावेना, खरोखरच ती भाग्यवान आहे’, अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.

हेही वाचा – शिवानी बावकर: मालिकाविश्व गाजवणाऱ्या शितलीच्या नजरेतला महिला दिन

दरम्यान, अनंत-राधिका यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमाला अमिताभ बच्चन, जया बच्चन, शाहरुख खान, आमिर खान, सलमान खान, करिना कपूर, सैफी अली खान, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, जान्हवी कपूर, सोनम कपूर, रितेश देशमुख, जिनिलीया देशमुख, अर्जुन कपूर, सुहाना खान, नव्या नवेली नंदा, टायगर श्रॉफ, करिश्मा कपूर, राणी मुखर्जी, सोनाली बेंद्रे, नताशा पूनावालासह बॉलीवूडचे अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहिले होते.

Story img Loader