गेल्या महिन्यापासून बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा सातत्याने चर्चेत आहेत. दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या आणि लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या बातम्या येत आहेत. सर्वात आधी दोघेही मुंबईत एका हॉटेलबाहेर दिसले होते, त्यानंतर अनेकदा त्यांना विमानतळावर एकत्र स्पॉट करण्यात आलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘किसी का भाई किसी की जान’चा ट्रेलर पाहून अभिनेत्याने उडवली सलमान खानच्या उंचीची खिल्ली; म्हणाला, “जेव्हा हिरो…”

लग्न व अफेअरच्या चर्चांवर परिणीती चोप्रा मौन बाळगून आहे, पण राघव चड्ढा मात्र त्याबद्दल प्रतिक्रिया देत असतात. पण ते लग्नाच्या प्रश्नांवर अप्रत्यक्ष बोलताना दिसत आहेत. त्यामुळे नक्की हे दोघं लग्न करणार आहेत की त्यांच्या अफेअरच्या निव्वळ अफवा आहेत, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. अशातच पुन्हा एकदा राघव चड्ढा यांनी लग्नाच्या प्रश्नाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, लग्नाबद्दलचा प्रश्न विचारताच ‘तुम्हाला सेलिब्रेशनची संधी मिळेल,’ असं राघव चड्ढा म्हणाले. त्यामुळे लवकरच या दोघांच्या नात्याबद्दल अधिकृत माहिती समोर येऊ शकते, असा अंदाज आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raghav chadha reacts to wedding rumours with parineeti chopra says celebration soon hrc