बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा व आप खासदार राघव चड्ढा यांचा साखरपुडा नुकताच पार पडला. परिणीती व राघव यांच्या साखरपुड्याला कलाविश्वाबरोबरच अनेक राजकीय मंडळींनीही हजेरी लावली होती. त्यांच्या साखरपुड्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
राघव चड्ढा यांनी साखरपुड्यातील काही खास फोटो त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत राघव चड्ढा यांनी परिणीतीसाठी खास पोस्ट लिहिली आहे. “एके दिवशी, ही सुंदर मुलगी माझ्या आयुष्यात आली आणि रंगबेरंगी हास्याने माझं आयुष्य उजळवून टाकलं,” असं त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
हेही वाचा>> Video : अभिनयातून ब्रेक घेत शेतीच्या कामात रमला आकाश ठोसर, ट्रॅक्टर चालवतानाचा व्हिडीओ व्हायरल
‘आमचा साखरपुडा हा आनंदाचा सोहळा होता. हसू, आनंदाश्रू व डान्सने कुटुंब आणखी जवळ आली. अगदी पंजाबींसारखंच,” असंही राघव चड्ढा यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. राघव चड्ढा यांनी परिणीती चोप्रासाठी केलेली ही खास पोस्ट सध्या चर्चेत आहे. या पोस्टवर परिणीती व राघव यांच्या चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.
परिणिती आणि राघव यांनी साखरपुड्यासाठी खास लूक केला होता. यावेळी परिणितीने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. तर राघव यांनी तिला ट्वीनिंग करत पांढऱ्या रंगाचा सूट घालत राजबिंडा लूक केला होता.