बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा यांचा १३ मे रोजी साखरपुडा झाला. लवकरच ते विवाहबंधनात अडकणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दोघांच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. आता राघव चड्ढा यांचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते रॅम्पवॉक करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून चाहते राघवला भाऊजी म्हणत चिडवताना दिसत आहेत.
साखरपुडा केल्यावर आता परिणीती आणि राघव लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. याबाबत खुद्द परिणीतीने खुलासा केला आहे. परिणीतीची चुलत बहीण आणि बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने परिणीती आणि राघवचे अभिनंदन करण्यासाठी तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. यावर, ‘मिमी दीदी, लवकरच तुला नवऱ्यामुलीला सगळी मदत करायची आहे,’ अशी कमेंट परिणीतीने केली आहे.
राघव यांच्या रॅम्पवॉकच्या फोटोवर कमेंट करताना एका यूजरने लिहिलं, ‘जिजाजींची बॉलीवूडमध्ये एन्ट्री’, तर दुसऱ्याने लिहिलं, ‘जिजाजी हिरो बनू शकतात,’ एका चाहत्याने लिहिलं, ‘तुम्ही हे करू शकता भाऊ.’ दुसऱ्या यूजरने कमेंट केली की, ‘जेव्हा मी हे चित्र पाहिलं तेव्हा मला वाटलं, राघव जुयाल आहे, आता मला आश्चर्य वाटलं.’ तर, ‘बाबूभय्या लडकी का चक्कर,’ असं म्हणत एकाने कमेंट केली आहे.
राघव चड्ढा यांनी प्रथमच रॅम्पवॉकमध्ये सहभाग घेतला होता. २०२२ मध्ये झालेल्या Lakme Fashion Show मध्ये राघव यांनी रॅम्पवॉक केलं होतं. या रॅम्पवॉकदरम्यान त्यांनी लेदर जॅकेट घातलं होतं. राघव चड्ढा यांच्या रॅम्पवॉकचा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
परिणीतीच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, परिणीती शेवटची अमिताभ बच्चन, अनुपम खेर आणि बोमन इराणी यांच्यासोबत सूरज बडजात्यांच्या ‘उंचाई’ चित्रपटात दिसली होती. लवकरच इम्तियाज अलीच्या ‘चमकिला’मध्ये परिणीती ही दिलजीत दोसांझबरोबर काम करणार आहे.